चोर तो चोर वर शिरजोर...पतीच्या विवाहबाह्य संबंधातून पतीनेच केली पत्नीची चाकू भोसकून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 08:20 PM2018-07-25T20:20:24+5:302018-07-25T20:20:57+5:30
अंधेरी पोलिसांनी केली आरोपी पतीला अटक
मुंबई - अंधेरी पूर्व येथे राहणाऱ्या जोडप्यामध्ये पतीच्या विवाहबाह्य संबंधावरून भांडणं होतं होती. याबाबत पत्नीने नातेवाईकांना कळविले म्हणून रागाच्याभरात पतीने पत्नीला वर्दळ नसलेल्या स्थळी नेले आणि तेथे काल चाकूने भोसकून हत्या केली. या खळबळजनक घटनेची माहिती रस्तावरील वाटसरूंनी पाहिल्यानंतर पोलिसांना दिली. त्यानंतर काल रात्री अंधेरी पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या. विकास राठोड (वय - २३) असं आरोपी पतीचे आहे.
मृत महिलेशी विकासचे प्रेमसंबंध होते. लग्नापूर्वीच ती गरोदर राहिल्याने घरच्यांनी आठ महिन्यांपूर्वी दोघांचा आठ महिन्यापूर्वी विवाह लावून दिला. दोघांचा संसार काही दिवस सुरळीत सुरु होता. मात्र, पत्नीला विकासचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याची कुणकुण लागली आणि त्यामुळे या दोघांत खटके उडू लागले. एकेदिवशी विकासच्या पत्नीने त्याच्या करतुदी नातेवाईकांना सांगितल्या. त्यानंतर नातेवाईकांमध्ये नालस्ती केल्याने रागाच्याभरत विकासने काल वर्दळ नसलेल्या ठिकाणी म्हणजेच कृष्ण डायिंग कंपनी आणि कणिका बिल्डिंग यांच्यामधील गल्लीत पत्नीला घेऊन गेला आणि चाकूने भोसकून तिची हत्या केली. स्थानिकांना मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोचले आणि माहिती घेतली. याबाबत अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी पती विकास राठोडला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.