उद्या करणार मोठी पोलखोल; धनंजय मुंडे प्रकरणी तक्रारदार महिला आणखी आक्रमक
By पूनम अपराज | Published: January 15, 2021 04:19 PM2021-01-15T16:19:48+5:302021-01-15T16:21:38+5:30
Renu Sharma And Dhananjay Munde : रेणूच्या वकिलांनी करिअर घडवण्याचे आमिष दाखवून मुंडे यांनी तिचे लैंगिक शोषण केले असून त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड देखील करण्यात आले असल्याची माहिती दिली.
मुंबई - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांच्या वकिलांनी ही आता गंभीर आरोप केला आहे. रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी स्वत: ही माहिती आज पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. तसेच त्यांनी रेणू शर्मा यांच्याविरोधात केलेले हनीट्रॅपचे सर्व आरोप खोटे असल्याचं त्यांनी सांगितले आहे. आज पत्रकार परिषदेस रेणू शर्मा हजर राहणार होत्या, मात्र त्या काही कारणास्तव येऊ शकल्या नाहीत.
गौप्यस्फोट! धनंजय मुंडे यांच्या मेहुण्याने केली होती रेणुसह तिच्या बहीणभावाविरोधात तक्रार
रेणू शर्माचा जबाब नोंदवणाऱ्या एसीपी ज्योत्स्ना रासम आहेत कोण? त्यांच्या कामगिरीचा आढावा जाणून घ्या
रेणूच्या वकिलांनी करिअर घडवण्याचे आमिष दाखवून मुंडे यांनी तिचे लैंगिक शोषण केले असून त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड देखील करण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच उद्या माध्यमांसमोर येऊन रेणू शर्मा पोलखोल करणार असल्याची माहिती देखील त्रिपाठी यांनी दिली. वकील रमेश त्रिपाठी यांना काल ७ वाजल्यापासून धमकीचे फोन येत आहेत. जवळपास ३० ते ४० कॉल आले असून मुंडेंच्या विरोधातील केस सोडण्यासाठी शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली गेली. अनेक नंबर मी ब्लॉक केले आणि काही नंबर रिसिव्ह करणं मी टाळतो अशी माहिती त्रिपाठी यांनी दिली. याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि गृहमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याचप्रमाणे जीवास धोका असल्याने सुरक्षेची मागणीही त्रिपाठी यांनी केली आहे. तसेच आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्रिपाठी यांनी केला आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला नाही तर आम्ही कोर्टात जाणार असल्याची माहिती पुढे त्रिपाठी यांनी दिली. रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रारही दाखल केली आहे.