चौकशीच्या फेऱ्यातील रियाला होऊ शकते?, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सीबीआयचं असं असेल पुढचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 06:05 PM2020-08-19T18:05:37+5:302020-08-19T18:07:04+5:30

Sushant Singh Rajput Suicide : रियाला अटक करण्याचं सीबीआय पुढचं पाऊल उचलू शकतं. त्यातच रियाची याचिका देखील सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. 

Will Rhea be arrested by CBI in interrogation round ?, CBI's next step after Supreme Court verdict | चौकशीच्या फेऱ्यातील रियाला होऊ शकते?, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सीबीआयचं असं असेल पुढचं पाऊल

चौकशीच्या फेऱ्यातील रियाला होऊ शकते?, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सीबीआयचं असं असेल पुढचं पाऊल

Next
ठळक मुद्देसीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसआयटी मुंबई युनिटच्या संपर्कात आहे. मुंबईत पोहचून पंचनामा दाखल होऊ शकतो. त्यानंतर सर्च ऑपरेशन पुन्हा सुरु होईल.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) दोन दिवस चौकशी केली. ईडीनं सुशांत प्रकरणी रियावर मनी लॉड्रिंगचा ठपका ठेवला आहे. अलीकडेच सुप्रीम कोर्टाने रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी दाखल केलेली प्रोटेक्टिव्ह ऑर्डरची याचिका फेटाळून लावली होती. तसेच सुप्रीम कोर्टाने सुशांत प्रकरणी तपास सीबीआयला करण्याचा आज आदेश दिले आहेत त्यामुळे रियाला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. रियाला अटक करण्याचं सीबीआय पुढचं पाऊल उचलू शकतं. त्यातच रियाची याचिका देखील सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. 

सीबीआयने प्रथमच याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता सीबीआयची विशेष तपास पथक मुंबईत दाखल होईल, सीबीआयचे पथक मुंबई पोलिसांकडून सुशांत प्रकरणी तपास डायरी मागेल, त्याशिवाय मुंबई पोलिसांनी घेतलेले जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि पोस्टपोर्टेम रिपोर्ट देखील सीबीआय आपल्या ताब्यात घेईल. सीबीआयचे पथक सुशांतने आत्महत्या केलेल्या फ्लॅटवर जाईल आणि क्राईम सीनची पाहणी करेल. सुशांतने आत्महत्या केली त्यावेळी घरी उपस्थित असलेल्या सर्वांचे जबाब घेईल. रिया, तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजित आणि अन्य लोकांना समन्स पाठवेल आणि त्यानंतर कोणाला अटक करायची गरज आहे की नाही यावर निर्णय घेईल. 

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसआयटी मुंबई युनिटच्या संपर्कात आहे. मुंबईत पोहचून पंचनामा दाखल होऊ शकतो. त्यानंतर सर्च ऑपरेशन पुन्हा सुरु होईल. सीबीआयद्वारे तपासाला सुरुवात करण्यासाठी मुंबईत दुसऱ्या ठिकाण शोधलं जात आहे. कारण सीबीआयच्या मुंबई कार्यालयात २५ कोरोनाबाधित सापडले असून ते कार्यालय बंद आहे. 

सुशांत सिंह राजपूतच्या बँक खात्यातून झालेले व्यवहार, दोन फ्लॅटची खरेदी याचा तपास ईडीनं सुरू केला आहे. त्याच संदर्भात चौकशी करण्यासाठी आज रियाला ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीचीदेखील चौकशी करण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रांची मागणी केली होती.

 

रिया ने दाखिल की थी याचिका (फाइल)

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर

 

दाऊदच्या हस्तकाने केला मोठा खुलासा, नेपाळमधून भारतात पाठवत होता नकली सोनं अन् नोटा 

 

सेक्स रॅकेटचा भांडाफोड, युनिसेक्स स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय अन् आक्षेपार्ह वस्तू सापडल्या

 

सुशांत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली प्रतिक्रिया 

Web Title: Will Rhea be arrested by CBI in interrogation round ?, CBI's next step after Supreme Court verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.