'तू माझ्यासोबत रोमान्स करशील का?...'; ऑनलाईन तरुणीने व्हिडीओ कॉलवर काढले कपडे, मग घडला धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 01:41 PM2023-04-01T13:41:32+5:302023-04-01T13:41:49+5:30
एका २२ वर्षाच्या तरुणाला व्हॉट्स अॅपवर मेसेज येतो, मेसेजमध्ये लिहिलेलं असतं, तुला माझ्यासोबत रोमान्स करायचा आहे का?
एका २२ वर्षाच्या तरुणाला व्हॉट्स अॅपवर मेसेज येतो, मेसेजमध्ये लिहिलेलं असतं, तुला माझ्यासोबत रोमान्स करायचा आहे का? यात तरुणीने पुढं लिहिलं होतं उत्तर 'हो' किंवा 'नाही' दे. तरुणाने मागचा पुढचा विचार न करता, हो असं उत्तर दिलं. काही वेळात त्या तरुणाला व्हिडीओ कॉल आला. लगेच त्या तरुणीने व्हिडीओ केला आणि सांगितलं मी आग्राची पूजा आहे. पुन्हा पुढं जे घडलं ते भयंकर होतं.
या प्रकरणी तरुणाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तरुणाने दिलेली माहिती अशी, तरुणीने व्हिडीओ कॉल करुन आपली कपडे काढण्यास सुरुवात केली. आणि मलाही कपडे काढण्यास सांगितले. मी ही पूर्णपणे कपडे काढले. पण तिने सर्व रेकॉर्ड केले. नंतर मला व्हॉट्सअॅपवर एक मेसेज पाठवून धमकी दिली. माझे रेकॉर्डिंग सोशल मीडिया साइटवर टाकणार असं यात सांगितले.
“मी भीतीपोटी माझ्या फोनवरून व्हॉट्सअॅप डिलीट केले आणि सर्व सोशल मीडिया अकाउंटही डिलीट केले, पण दुसऱ्या दिवशी मला एका व्यक्तीचा फोन आला त्याने मला सांगितले की, तो दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलचा अधिकारी आहे. माझ्याविरुद्ध तक्रार आली आहे, त्या आधारे ते वॉरंट काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी पुन्हा भयभीत झालो.
सायबर सेल ऑफिसर म्हणून ओळख असलेल्या एका व्यक्तीने तरुणाला व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले, त्यामुळे तरुणाने त्याच्या फोनवर व्हॉट्सअॅप पुन्हा डाउनलोड केले आणि त्याच्याशी बोलला. नंतर त्या व्यक्तीने नावेदला मोनू पांचाळ नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधून व्हिडीओ हटवण्यासाठी मदत करतो असं सांगितले यामुळे तरुणाचा त्यावर विश्वास बसला आणि तो तरुण इथेच फसला, इथूनच पुढं फसवणुकीचा खेळ सुरू झाला.
फिर्यादीनुसार, तरुणाने त्या व्यक्तीला फोन केला असता त्याने कामासाठी २१ हजार ८०० रुपये मागितले. ही रक्कम नंतर परत केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिले.
फिर्यादी तरुणाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “जतीन कुकरेजा यांच्या नावावर असलेल्या अॅक्सिस बँकेतील खात्याचे तपशील पांचाळ यांनी मला पाठवले. मी पैसे पाठवले, पण मला तेवढीच रक्कम तीन वेळा पाठवायला सांगितली गेली, म्हणजे एकूण ६४,५०० रुपये कारण आणखी तीन व्हिडीओ हटवायचे होते. ही रक्कम मला राम गोपालच्या नावावर असलेल्या एचडीएफसी बँकेतील दुसऱ्या खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले.
Ratnagiri- मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे घाटात तरुणाचा मृतदेह आढळला, घातपाताची शक्यता
काही वेळाने तरुणाला पुन्हा मोनू पांचाळचा फोन आला. याप्रकरणी सायबर सेलच्या अधिकाऱ्याला ईमेल लिहिला असून नावेद खान यांनी अधिकाऱ्याशी बोलणे आवश्यक असल्याचे पांचाळ यांनी सांगितले.
तरुणाने पुढं सांगितले, “जेव्हा मी बनावट सायबर सेलच्या अधिकाऱ्याला फोन केला तेव्हा त्यांनी माझ्याकडे आणखी दीड लाख रुपये मागितले. माझ्या सांगण्यावरून त्याने रक्कम कमी केली आणि मी त्याला पैसे दिले, पण तो पुन्हा पुन्हा जास्त पैसे मागत राहिला.
पोलिसांत गुन्हा दाखल करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरला नाही. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सायबर सेलने सांगितले की, ते तक्रारीची चौकशी करत असून दोषींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तपासकर्त्यांनी सांगितले की, रेकॉर्ड केलेले अश्लील व्हिडिओ दाखवून लोकांना आमिष दाखवून पैसे उकळणे ही सायबर गुन्हेगारांची सर्रास खेळी बनली आहे.