२४ तासांत लातूर पोलिसांनी खुनाच्या २ आरोपींना केलं जेरबंद; कोर्टासमोर केले हजर

By राजकुमार जोंधळे | Published: August 10, 2024 09:15 PM2024-08-10T21:15:41+5:302024-08-10T21:16:08+5:30

चिंचोलीराव शिवारात गंगापूर रोडलगतच्या खड्ड्यात अनोळखी व्यक्तिचा मृतदेह आढळून आला हाेता.

Within 24 hours Latur police arrested 2 accused of murder; Appeared before the court | २४ तासांत लातूर पोलिसांनी खुनाच्या २ आरोपींना केलं जेरबंद; कोर्टासमोर केले हजर

२४ तासांत लातूर पोलिसांनी खुनाच्या २ आरोपींना केलं जेरबंद; कोर्टासमोर केले हजर

लातूर - खून करुन मृतदेह खड्ड्यात फेकून देत पलायन करणाऱ्या दाेघांना एमआयडीसी पाेलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली आहे.  याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाेघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

पाेलिसांनी सांगितले, ६ ऑगस्ट राेजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोलीराव शिवारात गंगापूर रोडलगतच्या खड्ड्यात अनोळखी व्यक्तिचा मृतदेह आढळून आला हाेता. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असून, अजय नामदेव चव्हाण (वय २५, रा. अलमला तांडा ता. औसा) असे नाव आहे. याबाबत आईच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता.

आराेपींच्या शाेधासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी आदेश दिले हाेते. पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या पथकाने अवघ्यात २४ तासामधये या गुन्ह्याचा छडा लावला असून, दाेघा आराेपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अधिक चाैकशी केली असता, मयत तरुणाच्या पत्नीचा लग्नापूर्वीचा मित्र अनिल गोविंद जाधव (रा. चिंचोलीराव तांडा) आणि साथीदार सुशिल संतोष पवार (रा. चिंचोलीराव ता. लातूर) याच्या मदतीने तरुणाचा दोरीने गळा आवळून ठार केल्याची कबुली दिली. आरोपींना अटक करण्यात आली असून, तपास पोउपनि. श्रीकांत मोरे हे करीत आहेत.

ही कारवाई पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीकांत मोरे, शिवाजी देवकते, भिमराव बेल्लाळे, अरविंद शिंगाडे, किरण शिंदे, लक्ष्मीकांत देशमुख, सुदर्शन पांढरे, बळवंत भोसले, ईश्वर तुरे, राम जाधव, विशाल कोडे यांच्या पथकाने केली.

Web Title: Within 24 hours Latur police arrested 2 accused of murder; Appeared before the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.