बायका ड्रग्जविक्रेत्या, नवरे मोबाइल चोर! ८ लाखाच्या हेरॉइनसह १२ लाखांचे मोबाइल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 12:52 PM2024-10-25T12:52:37+5:302024-10-25T12:54:43+5:30

कोपरी परिसरात बुधवारी रात्री सापळा रचून गुन्हे शाखेची कारवाई

Wives are drug dealers husbands are mobile thieves Mobiles worth 12 lakh seized along with heroin worth 8 lakh | बायका ड्रग्जविक्रेत्या, नवरे मोबाइल चोर! ८ लाखाच्या हेरॉइनसह १२ लाखांचे मोबाइल हस्तगत

बायका ड्रग्जविक्रेत्या, नवरे मोबाइल चोर! ८ लाखाच्या हेरॉइनसह १२ लाखांचे मोबाइल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : अमली पदार्थ विक्रीसह मोबाइल चोरी करणाऱ्या टोळीतील चौघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ८ लाखाचे हेरॉइन व १२ लाखांचे मोबाइल जप्त केले आहेत. या आरोपींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या कारवाई दरम्यान दोघे जण पळून गेले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

अंमली पदार्थ विक्रीमध्ये सक्रिय असलेल्या टोळीबद्दल अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या सूचनेवरून वरिष्ठ निरीक्षक संदीप निगडे यांनी सहायक निरीक्षक श्रीकांत नायडू, नीलेश धुमाळ, ज्ञानेश्वर बनकर आदींचे पथक केले होते. 

या पथकाने कोपरी परिसरात बुधवारी रात्री सापळा रचला होता. त्याठिकाणी संशयित महिला इतर काही महिला व पुरुषांशी चर्चा करत असतानाच पथकाने त्यांना ताब्यात घेतले. यावेळी दोन पुरुष पळून गेले, तर तीन महिला व एक पुरुष पोलिसांच्या हाती लागले. मोहम्मद जिशान पपू, रजिमा शमसुद्दीन शेख, अकलीना शेख व रजिमा शेख अशी या आरोपींची नावे आहेत. रजिमा शेख ही मानखुर्दची राहणारी असून मुंबईतून ड्रग्ज घेऊन कोपरी येथे देण्यासाठी आली होती.

पश्चिम बंगालचे मूळ रहिवासी

  • सर्व जण मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी असून कोपरीत एकत्र राहायला होते. 
  • त्यांच्यातील पुरुष हे परिसरात मोबाइल चोरी करायचे, तर महिला कोपरी परिसरात ड्रग्ज विक्री करायच्या, असे पोलिस तपासात उघड झाले आहे.

Web Title: Wives are drug dealers husbands are mobile thieves Mobiles worth 12 lakh seized along with heroin worth 8 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.