बनावट वीर्य वापरून पोलिसांची दिशाभूल; तब्बल १७ मुलांचं युवतीनं केलं लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 02:15 PM2023-03-27T14:15:16+5:302023-03-27T14:16:12+5:30

पोलिसांच्या तपासात हे सीमेन सँपल मुलांचे नव्हते तर अन्य लिक्विड असल्याचं उघड झाले

Woman accused of molesting 17 boys 'used fake semen to frame victims for rape' | बनावट वीर्य वापरून पोलिसांची दिशाभूल; तब्बल १७ मुलांचं युवतीनं केलं लैंगिक शोषण

बनावट वीर्य वापरून पोलिसांची दिशाभूल; तब्बल १७ मुलांचं युवतीनं केलं लैंगिक शोषण

googlenewsNext

लैंगिक शोषणाची समस्या ही देशासह विदेशातही मोठ्या प्रमाणात आहे. बळजबरीनं लैंगिक शोषण करणे हा गुन्हा असून कायद्याने दोषीला शिक्षा सुनावली जाते. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे जिथं एका युवतीने खोटं बोलून आणि पोलिसांची दिशाभूल करत १७ अल्पवयीन युवकांचे लैंगिक शोषण केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

हे प्रकरण इंडोनेशियातील असून याठिकाणी एका महिलेने १७ मुलांवर शोषणाचा आरोप करत बनावट बलात्काराची कहानी रचली. या महिलेने मुलांना फसवण्यासाठी फेक सीमेनचा उपयोग केला. स्वत:ला बलात्कार पीडित असल्याचं तिने पोलिसांना भासवले. २५ वर्षीय यूआनिता सारी अंगरैनी प्लेस्टेशनच्या बहाण्याने ८ ते १५ वयोगटातील मुलांना तिच्या जाळ्यात ओढले. या मुलांचे लैंगिक शोषण केले. 
तपासात पोलिसांसमोर यूआनिताने ८ मुलांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा दावा केला. तिने पोलिसांसमोर तिच्या शरीरावरील ओरबडलेल्या खूणा दाखवल्या. बलात्कारावेळी मी स्वत:चा बचाव केला त्यावेळी या जखमा झाल्याचे तिने सांगितले. महिलेच्या या आरोपानंतर पोलिसांनी तिचे सीमेन सँपल तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले. तेव्हा हे बनावट असल्याचं समोर आले. 

पोलिसांच्या तपासात हे सीमेन सँपल मुलांचे नव्हते तर अन्य लिक्विड असल्याचं उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी वर्दीचा धाक दाखवला तेव्हा यूआनिताने सर्व सत्य पोलिसांना सांगितले. तिच्या शरीरावर असलेल्या जखमांच्या खूणा तिने स्वत:चं बनवल्याचे ती म्हणाली. आता पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत. काही रिपोर्टनुसार १२ वर्षीय आणि १४ वर्षीय मुलांसोबत यूआनिताने जबरदस्तीने संबंध ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. 

पोलिसांनी या प्रकरणाचे सत्य शोधण्यासाठी चौकशीला सुरुवात केलीय. लहान मुलांचे लैंगिक शोषण प्रकरणात जर यूआनिता दोषी आढळली तर इंडोनेशिया कायद्यानुसार १५ वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. 

Web Title: Woman accused of molesting 17 boys 'used fake semen to frame victims for rape'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.