Crime News : ऑपरेशन थिएटरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, पीडितेचा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 02:43 PM2021-10-10T14:43:39+5:302021-10-10T14:44:30+5:30

Crime News : या घडलेल्या प्रकरणाबद्दल रुग्णालयाच्या डॉक्टरांना कोणतीही माहिती न देता पीडित महिला सिव्हिल रुग्णालयात दाखल झाली. त्यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.

woman alleges gang rape hospital staff in operation theatre bathinda | Crime News : ऑपरेशन थिएटरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, पीडितेचा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर आरोप

Crime News : ऑपरेशन थिएटरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, पीडितेचा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर आरोप

Next
ठळक मुद्देपोलिसांनी महिलेची तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

भटिंडा : पंजाबमधील भटिंडा शहरातील एका खासगी रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या पीडित महिलेने रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे म्हटले आहे. (woman alleges gang rape hospital staff in operation theatre bathinda)

पीडित महिलेने सिव्हिल रुग्णालय भटिंडामध्ये दाखल होऊन तिची वैद्यकीय तपासणी केली आहे आणि पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. पोलिसांनी महिलेची तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान, येथील फाजिल्का जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल असलेल्या या पीडित महिलेने सांगितले की, ऑपरेशनसाठी भटिंडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 4 ऑक्टोबर रोजी हे ऑपरेशन होणार होते. यासाठी रुग्णालयातील कर्मचारी ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. यानंतर बेशुद्ध करणारे इंजेक्शन देण्यात आले. नंतर ऑपरेशन थिएटरमध्येच 6 लोकांनी सामूहिक बलात्कार केला.

दरम्यान, या घडलेल्या प्रकरणाबद्दल रुग्णालयाच्या डॉक्टरांना कोणतीही माहिती न देता पीडित महिला सिव्हिल रुग्णालयात दाखल झाली. त्यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. तसेच, येथील सिव्हिल लाईन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
 

Web Title: woman alleges gang rape hospital staff in operation theatre bathinda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.