बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक, पवईच्या महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 01:42 AM2020-03-17T01:42:07+5:302020-03-17T01:42:18+5:30

१९ लाख १३ हजार ८८८ रुपयांची रक्कम सदर महिलेने परत न करता बँकेची फसवणूक केल्याचे बँक प्रशासनाच्या निदर्शनास आले.

woman arrested for cheating with fake documents | बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक, पवईच्या महिलेस अटक

बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक, पवईच्या महिलेस अटक

Next

ठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे आपण आयआयटी पवई येथे हॉस्टेल मॅनेजर असल्याची बतावणी करीत स्टेट बँक आॅफ इंडियाची १९ लाख १३ हजार ८८८ रुपयांची फसवणूक करणाऱ्या प्रणाली दिलीप चव्हाण (३९, पवई, मुंबई) हिला नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. तिला १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

प्रणाली हिने ठाण्यातील वागळे इस्टेट येथील मिलेनियम टोयाटो येथून कार घेण्यासाठी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नौपाडा शाखेतून १९ लाख ९० हजारांचे कर्ज घेतले. हे कर्ज घेताना तिने आयआयटी, पवई येथे हॉस्टेल मॅनेजर म्हणून नोकरीला असल्याची बतावणी केली. त्यासाठी तिच्या नावाचे ओळखपत्र, तीन महिन्यांचे पगारपत्रक, नियुक्तीपत्र, आयआयटी पवईचे निवासस्थान असल्याचे पत्र, दोन वर्षांचे फॉर्म क्र. १६ अशी सर्व बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानुसार, ३ एप्रिल २०१९ रोजी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नौपाडा शाखेत जाऊन तिने या कागदपत्रांच्या मूळ प्रतीही सादर केल्या.

त्याआधारे तिला या बँकेमार्फत कारखरेदीसाठी १९ लाख ९० हजारांचे कर्ज मंजूर करण्यात आले. त्यातील ७६ हजार ११२ रुपयांची तिने बँकेला परतफेडही केली. मात्र, १९ लाख १३ हजार ८८८ रुपयांची रक्कम तिने परत न करता बँकेची फसवणूक केल्याचे बँक प्रशासनाच्या निदर्शनास आले.
ही बाब निदर्शनास आल्यानंतर बँकेच्या नौपाडा शाखेच्या उपव्यवस्थापक लक्ष्मी तावडे यांनी तिच्याविरुद्ध ७ आॅक्टोबर २०१९ रोजी अपहार आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांच्या पथकाने प्रणालीला मुंबईतून १३ मार्च रोजी ताब्यात घेतले.

न्यायालयाने सुुरुवातीला प्रणालीला १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा ठाणे न्यायालयाने तिला आणखी चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पतीलाही घेणार ताब्यात
आरोपीने प्रणाली चव्हाणने पतीच्या मदतीनेच बनावट कागदपत्रे बँकेत सादर करून कर्ज मंजूर करून घेतल्याची बाब तपासात समोर आली आहे. त्यामुळे तिचा पती दिलीप चव्हाण यालाही लवकरच ताब्यात घेणार असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.
 

Web Title: woman arrested for cheating with fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.