धक्कादायक! महिलेकडे सापडलं असं ड्रग्स जे १० लाख लोकांचा जीव घेऊ शकतं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 10:54 AM2021-06-01T10:54:12+5:302021-06-01T10:55:17+5:30
जेव्हा तिच्या कारची तपासणी करण्यात आली तेव्हा तिच्याकडे २ किलोग्रॅम सिंथेटिक ओपिओइड Fentanyl ड्रग्स आढळून आलं.
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये एका महिलेला २५ मे रोजी एका अशा औषधासोबत पकडण्यात आलं जे कमीत कमी १० लोकांचा जीव घेऊ शकतं. Fox6 न्यूजनुसार, महिलेकडे २ किलोग्रॅम Fentanyl हे ड्रग्स सापडलं. जे कमीत कमी १० लोकांचा जीव घेऊ शकतं.
२४ वर्षीय कॅरन ग्रासियाला पोलिसांनी क्लब बॉलवार्ड अॅन्ड वॉट्स स्ट्रीटजवळ अडवलं होतं. जेव्हा तिच्या कारची तपासणी करण्यात आली तेव्हा तिच्याकडे २ किलोग्रॅम सिंथेटिक ओपिओइड Fentanyl ड्रग्स आढळून आलं. या कारमध्ये कॅरनसोबत तिची ४ वर्षांची मुलगीही सोबत होती. चौकशीनंतर पोलिसांनी मुलीला परिवाराकडे सोपवलं आहे.
ड्रग इंफोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनच्या वेबसाइटनुसार, Fentanyl एखाद्या जुनी वेदना दूर करण्यासाठी प्रभावी ठरतं. किंवा याचा वापर एखाद्या सर्जरी दरम्यानही केला जातो. हे औषध मॉरफिनपेक्षा १०० पटीने अधिक असरदार असतं. रूग्णांना हे औषध केवळ मेडिकल प्रोफेशनल्सच देऊ शकतात. याचा चुकीचा वापर करण्याचीही अनेकदा शक्यता असते. असा अंदाज आहे की, हे १ किलो ड्रग्स ५ लाख लोकांचा जीव घेऊ शकतं.
हे ड्रग्स इतर काही बेकायदेशीर ड्रग्समध्ये मिश्रित करून स्प्रे आणि पावडर बनवून विकलं जातं. Centres for Disease Control and Prevention (CDC) च्या रिपोर्टनुसार, यात ७२ टक्के लोकांचा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोजमुळे होतो. कॅरनवर आता ड्रग्स तस्करी आणि बाल शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला ७२ लाख रूपयांचा सुरक्षित बॉन्ड द्यावा लागेल.