Honey Trap: पती होता गरीब, पत्नीने इच्छा पूर्ण करण्यासाठी घेतला स्वत:च्या सौंदर्याचा फायदा आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 04:19 PM2022-04-27T16:19:41+5:302022-04-27T16:20:32+5:30
Honey Trap: आतापर्यंत तिने व्यापाऱ्याकडून २३ लाख रूपये वसूल केले होते. जेव्हा हे प्रकरण पोलिसात गेलं तेव्हा महिलेसोबत ३ लोकांना अटक करण्यात आली आहे.
Rajasthan Nagaur Honey Trap: राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात हनी ट्रॅपची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिला एका मार्बल व्यापाऱ्याला आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत होती. आतापर्यंत तिने व्यापाऱ्याकडून २३ लाख रूपये वसूल केले होते. जेव्हा हे प्रकरण पोलिसात गेलं तेव्हा महिलेसोबत ३ लोकांना अटक करण्यात आली आहे.
नागौर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ एप्रिलला मकरानातील बुल्डकोच्या ढाणीचे रहिवाशी मार्बल व्यापारी न सांगताच घरातून निघून गेले. २३ एप्रिलला कुटुंबियांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. व्यापारी सापडल्यावर पोलिसांनी चौकशी तर हैराण करणारं प्रकरण समोर आलं. व्यापारी आत्महत्या करण्यासाठी जात होता.
पीडित मार्बल व्यापाऱ्याने पोलिसांना सांगितलं की, रेखा कंवर आणि शैतान सिंहने त्याचा अश्लील व्हिडीओ बनवला होता आणि तो व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी २३ लाख रूपये लुटले होते. रेखा पती विक्रम सिंहसोबत झोपडीसारख्या घरात राहत होती. त्यांची आर्थिक स्थिती खराब होती. रेखाला लक्झरी लाइफ जगायचं होतं. तेच मार्बल कंपनीत दगड फोडण्याचं काम करणारा तिचा पती तिच्या इच्छा पूर्ण करू शकत नव्हता.
यानंतर रेखाने आपल्या सौंदर्याला हत्यार बनवून पैसे कमावण्याचा प्लान केला. तीन वर्षाआधी ती मार्बल व्यापाऱ्याच्या संपर्कात आली. तिने हळूहळून व्यापाऱ्याला आपल्या जाळ्यात ओढलं. यात रेखाचा मित्र शैतान सिंह याने तिला साथ दिली. रेखाने मार्बल व्यापाऱ्यासोबत शारीरिक संबंध बनवण्याचा व्हिडीओ शूट केला. आणि शैतान सिंहच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करू लागली. व्यापाऱ्याने आधी २३ लाख रूपये दिले. त्यानंतर रेखाची लालसा वाढली आणि तिने त्याच्याकडे ५० लाख रूपयांची डिमांड केली.
आता व्यापारी टेंशनमध्ये होता आणि त्याने आत्महत्येचा मार्ग निवडला. याआधी त्याने त्याच्या बहिणीला सगळं प्रकरण सांगितलं. ज्यानंतर दोघे भाऊ-बहीण पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. पोलिसांना प्रकरणाची माहिती दिली आणि महिला व तिच्या सहकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांनी आरोपी रेखा, तिचा मित्र शैतान सिंह आणि पती विक्रम सिंह याला अटक केली आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.