स्वत:च्या घरात ११ लाखांची चोरी करणाऱ्या महिलेसह तीच्या सहकाऱ्याला १२ तासात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 10:39 PM2021-12-06T22:39:27+5:302021-12-06T22:40:19+5:30
Robbery Case : सलमा हिचा नवरा जसीम याला बनावट नोटा प्रकरणी तीन वर्षापूर्वी अटक करण्यात आली होती.
कुमार बडदे
मुंब्राः सहकाऱ्याच्या मदतीने स्वताच्या घरात चोरी करुन,चेहऱ्यावर साळसूद पणाचा आव आणून नणंदे बरोबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या महिलेसह तीच्या सहकाऱ्याला मुंब्रापोलिसांनी अवघ्या १२ तासात अंत्यत शिताफीने अटक करुन त्यानी चोरलेला संपूर्ण ११ लाख १३ हजार ७०० रुपायांचा ऐवज ताब्यात घेतला.
अमृत नगर भागातील शादीमहल रोड परीसरातील चिस्तिया नगर,सी विंग इमारतीच्या रुम नंबर ४०१ च्या दरवाजाचा लाँक तोडून,शयनगृहातील कपाटामधील ऐवज घरफोडी करुन चोरुन नेल्याची तक्रार आफरीन शेख यानी ५ डिसेंबरला दाखल केली होती.सहाय्यक पोलिस आयुक्त व्यंकट आंधळे,वरीष्ठ पोलिस निरीक्षक दादाहरी चौरे तसेच पोलिस निरीक्षक गिताराम शेवाळे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शना खाली याप्रकरणाचा तपास करणा-या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक कृपाली बोरसे आणि त्यांच्या पथकातील पोलिस नायक दिलीप किरपण,प्रविण कुंभार,पोलिस काँन्स्टेबल नवनाथ चव्हाण,पोलिस शिपाई रुपेश शेळके यांनी सीसीटिव्हि फुटेजच्या आधारे घटनास्थळा जवळ दिसून आलेल्या शिबान खान (वय १९,रा.शादाब अपार्टमेंन्ट ,डोंगरे चाळ,किस्मत काँलेनी,मुंब्रा) याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने त्याची सहकारी (तक्रारदार महिलेची भावजय) सलमा शेख(वय ३९,रा.चिस्तिया नगर,सी विंग ,रुम नंबर ४०१) हीच्या मदतीने चोरी केल्याचे कबुल केले.त्यानी चोरलेला लँपटाँप,मोबाईल,मनगटी घड्याळ,सोन्या-चांदिचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.दरम्यान सलमा हिचा नवरा जसीम याला बनावट नोटा प्रकरणी तीन वर्षापूर्वी अटक करण्यात आली होती.याप्रकरणी सध्या तो कारागृहात असल्याची माहिती बोरसे यांनी लोकमतला दिली.