महिलेची फेसबुकवर मैत्री झाली, मित्राने भेटायला बोलावलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 10:11 PM2020-02-21T22:11:28+5:302020-02-21T22:13:06+5:30
तिच्यावर सलग तीन दिवस बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
मथुरा - उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एका महिलेला फेसबुकवर मैत्री करणं म्हणजे लैंगिक शोषणाला बळी पडावं लागलं आहे. फेसबुक मित्राने पीडित महिलेला भेटायला बोलावलं आणि गुंगीचं औषध देऊन तिला बेशुद्ध केले. तिच्यावर सलग तीन दिवस बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्यानंतर महिलेला रेल्वे स्थानकावर सोडून तेथून पळ काढला. पीडितेने दिलेली माहिती ऐकून जीआरपीला धक्का बसला. पोलिसांनी रेल्वे चाईल्ड लाईन आणि महिला हेल्पलाईनला बोलवून महिलेच्या स्वाधीन केले आहे, महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
फेसबुक जितकं माणसांना जोडायला चांगलंय तितकंच अनोळखी लोकांच्या जोडल्या गेल्यामुळे वाईट आहे. फेसबुकच्या माध्यमातून कोलकाता येथील एका महिलेशी मैत्री केली, त्यानंतर त्या युवकाने त्या महिलेला भेटण्यास बोलावले आणि ऑनलाईन मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ती महिला अनेकदा तरुणाला भेटत राहिली आणि महिलेवर संधी साधत आरोपीने तिचे लैंगिक शोषण केले.
पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, 4 वर्षांपूर्वी मुकेश राणा नावाच्या व्यक्तीशी फेबसुकवर मैत्री झाली आणि त्याच्या प्रेमात पडले. आपला प्रियकर सैन्यात असल्याचेही या महिलेने सांगितले आहे. त्याने १६ तारखेला भेटायला मला बोलावले आणि माझ्याशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्याने मला मारहाण केली. तसेच पीडित महिलेचा असा आरोप देखील आहे की, गेल्या ४ वर्षांपासून त्याचे माझ्यासोबत शारीरिक संबंध होते. आरोपी व्यक्ती विवाहित असून भरतपूरचा रहिवासी आहे.
त्याने तीन दिवस माझ्यावर लैंगिक अत्याचार करून मला सोडून पळून गेला असेही पीडित महिला पोलिसांना म्हणाली आहे. पीडित महिलेला मारहाण करत फोन तोडला आणि सर्व पुरावे नष्ट देखील त्याने केले. पीडित महिलेने जीआरपीमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.