भयंकर! ब्लॅकमेल करत तब्बल 21 वर्षे केले लैंगिक शोषण अन् नंतर केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 04:14 PM2020-12-19T16:14:23+5:302020-12-19T16:21:06+5:30
Crime News : ब्लॅकमेल करत तब्बल 21 वर्षे महिलें लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पीलीभीत - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमध्ये घडली आहे. ब्लॅकमेल करत तब्बल 21 वर्षे महिलें लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर मालमत्तेच्या हव्यासापोटी महिलेची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका 42 वर्षीय महिलेची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कॉलेजमधील एक क्लार्क आणि त्याच्या दोन साथीदारांवर हत्येचा आरोप आहे. 21 वर्षांपासून या आरोपींनी तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर तिची हत्या केली.
पीलीभीत पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानंतर मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदारांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडे अनेकदा याबाबत तक्रारी करूनही काही उपयोग झाला नाही. अखेर न्यायालयात धाव घेतली असं मृत महिलेच्या वृद्ध आईने सांगितलं आहे. सुनगडी पोलीस ठाण्याचे एसएचओ अतर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींच्या विरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.
मृत महिलेच्या वृद्ध आईने मुलीसोबत घडलेल्या भयंकर प्रकाराची माहिती दिली आहे, "माझी मुलगी 21 वर्षांची होती. त्यावेळी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. आरोपी रमेश सिंह हा महाविद्यालयात क्लार्क होता. त्याचे आणि माझ्या मुलीचे प्रेमसंबंध जुळले. त्यावेळी त्याने तिचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर तो ब्लॅकमेल करू लागला. माझ्या मुलीचे आयुष्य उद्धस्त झाले. तिचे लग्न झाल्यानंतर आरोपीने तिच्या पतीला सर्व सांगितले. त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला.
भय इथले संपत नाही! कोरोनाच्या संकटात आणखी एका आजाराचा कहरhttps://t.co/BZngg22y8k#coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) December 19, 2020
मुलीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर आरोपीचे घरी येणे-जाणे वाढले. मी हतबल होती. रमेश हा नेहमी येताना सोबत त्याचा साथीदार चंद्रशेखर आणि दिलीप सिंह यांनाही घेऊन येत होता. 12 मार्च रोजी काही कामानिमित्त मी घराबाहेर होते. त्या तिघांनी मिळून माझ्या मुलीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह जाळला अशी माहिती त्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Farmers Protests : जीवघेण्या थंडीत गेल्या 22 दिवसांपासून सुरू आहे शेतकऱ्यांचं आंदोलनhttps://t.co/89p1zdF19Z#FarmersBill#FarmersProtests#FarmersProtest2020#FarmerProtestDelhi2020
— Lokmat (@MiLOKMAT) December 17, 2020