धाडस करून महिलेन चोरट्याला पकडले; मात्र त्याने मंगळसूत्रच कुठेतरी फेकून दिले!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 10:38 PM2021-08-11T22:38:46+5:302021-08-11T23:32:57+5:30
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश मांजरेकर हे पत्नीसह छत्रपती शिवाजी टर्मिनस येथुन कल्याणला जाण्यासाठी लोकल प्रवास करत होते.
कल्याण- सध्या मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकावर चोरीच्या घटना वाढल्या आहेत. कोपर रेल्वे स्थानकामध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला महिलेच्या पतीने धाडस दाखवत पकडले. मात्र चोरट्याने हे मंगळसूत्र कुठेतरी फेकून दिल्याने ते हस्तगत करता आले नाही. कोपर रेल्वे स्थानकात लोकल आल्यावर मंगळसूत्र खेचले आणी लोकलने काहीसा वेग घेतल्यावर चोराने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे फलाटावर पाठलाग करत महिलेच्या पतीने या चोरट्यास पकडले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश मांजरेकर हे पत्नीसह छत्रपती शिवाजी टर्मिनस येथुन कल्याणला जाण्यासाठी लोकल प्रवास करत होते. लोकल कोपर रेल्वे स्थानकात येताच धीमी झाल्यावर याच डब्यात बसलेला सोनसाखळी चोरटा आकाश रामदास चव्हाण ( १९, ज्योती नगर ,पाण्याची टाकी शेजारी , शंकर मंदिर जवळ ,कोपर -पूर्व ) याने संधीचा फायदा घेत अविनाश याच्या पत्नीच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र अविनाशने आकाशचा पाठलाग करत रेल्वे फलाटावर पकडले. त्याने मंगळसूत्र कुठेतरी फेऊन दिल्याने पोलिसांना सापडले नाही. डोंबिवली लोहमार्ग पोलीसांनी आकाशला अटक करून कोर्टात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक ढगे करत आहेत.