पॉलीसीचे अडकलेले पैसे काढून देण्याच्या बहाण्याने महिलेची 17 लाखांची फसवणुक , पाच जणांच्या टोळीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 07:40 PM2020-08-21T19:40:09+5:302020-08-21T19:40:55+5:30
या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी ज्या मोबाइल क्रमांकावरुन त्या महिलेला फोन आला होता, त्याचा तपास करुन पाच जणांच्या टोळकीला अटक केली आहे.
ठाणे - विमा कंपनीत अडकलेले पैसे मिळवून देतो, असे सांगून ठाण्यातील एका महिलेला 17 लाखांना फसविले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी ज्या मोबाइल क्रमांकावरुन त्या महिलेला फोन आला होता, त्याचा तपास करुन पाच जणांच्या टोळकीला अटक केली आहे. या टोळकीने पुणे, मुंबई, येथील काहींनी अशाच प्रकारे फसविले असल्याची माहिती देखील तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी अशिषकुमार कमलेश तिवारी (30), भाऊराव हरिभाऊ आखाडे (30), विनीत सूर्यकांत झा (30), विनय घनश्याम तावडे (30) आणि निखिल देविदास नारकर (30) अशी अटक करण्यात आले आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात राहणा-या 45 वर्षीय महिलेने काही महिन्यांपूर्वी विम्या कंपन्यांमध्ये 5 पॉलिसी घेतल्या होत्या. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सदर महिलेस सुमित आहुजा नामक एका व्यक्तीचा इमेल आला होता. तुमच्या पॉलिसीच्या प्लॅनमध्ये दिशाभूल झाली असल्याचे या मेल मध्ये नमूद करण्यात आले होते. त्यानंतर सदर इमेल मध्ये नमूद फोन क्र मांकावर महिलेने फोन करून विचारणा केली असता या व्यक्तीने सदर कंपनीच्या सव्र्हीसेस डिपार्टमेंट मधून बोलत असल्याचे सांगत तक्र ारदार महिलेस तुमची जुनी पॉलिसी ऐवजी नवी पॉलिसी घेतली आणि त्या पॉलिसीचा कालावधी वाढवला तर तुम्हाला त्वरीत जास्त फायदा होईल असे पटवून दिले. त्यानंतर तक्र ारदार महिलेशी वारंवार फोन वरून संपर्क करून त्यांना एनईएफटी व आयएमपीएस द्वारे विविध बँकेत 17 लाख रु पये भरणा करण्यास भाग पाडले. मात्र, भरणा केलेली रक्कम संबंधित विमा कंपनीस प्राप्त झाली नसल्याचे समोर आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने या महिलेने नौपाडा पोलिसात 17 जुलै रोजी फिर्याद दाखल केली.
या घटनेतील आरोपींनी वापरलेल्या मोबाईल क्र मांकाचे लोकेशन नौपाडा पोलिसांनी पडताळले. त्यावरून तिघांना डोंबिवलीतून तर अन्य दोघांना मुंबईतून अटक करण्यात आली. पुण्यातील विमाननगर, विश्रंतवाडी, मुंबईतील वाकोला आणि खेरवाडी तसेच ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात या टोळीवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली. विशेष म्हणजे पूर्वी विमा कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करणा:या या भामटय़ांनी मुंबई, पुणो, ठाणो येथील नागरीकांची फसवणुक केली असून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी फसवणुकीतील रक्कमेतून अनेक मालमत्ता खरेदी केल्या होत्या. या मालमत्ता आता जप्त करण्यात येत असल्याचेही मांगले यांनी स्पष्ट केले.