महिलेला स्वयंपाकगृहात कोंडून दागिने पळविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 14:42 IST2019-02-23T14:41:45+5:302019-02-23T14:42:38+5:30
महिला पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेली असता, स्वयंपाक घराचा दरवाजा बंद करून बाहेरून कडी लावून आरोपीने दागिने पळवले.

महिलेला स्वयंपाकगृहात कोंडून दागिने पळविले
पिंपरी : पिपरी- चिंचवड, तानाजीनगर येथे फिर्यादीच्या घरी पैशांची मागणी करण्यासाठी आरोपी आला. फिर्यादी महिलेने पैसे देण्यास नकार दिला, त्यावेळी आरोपीने महिलेस पाणी आणण्यास सांगितले. महिला पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेली असता, स्वयंपाक घराचा दरवाजा बंद करून बाहेरून कडी लावून आरोपीने दुसऱ्या खोलीतील कपाटातून २८ हजारांचे दागिने शुक्रवारी पळवून नेले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजीनगर येथे राहणाऱ्या रेश्मा सचिन बच्छाव या महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. प्रशांत अल्बर्ट पारकर (वय २७,रा.सज्जनगड कॉलनी,रहाटणी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने फियार्दीच्या घरी जावून पैशांची मागणी केली. पैसे देण्यास महिलेने नकार दिला. त्यावेळी निदान पिण्यासाठी पाणी तरी द्या असे म्हणत आरोपी तेथेच थांबला. पाणी आणण्यासाठी महिला स्वयंपाक घरात गेली. त्यावेळी आरोपीने स्वयंपाक घराची बाहेरुन कडी लावली. हॉलमधील कपाट उघडून १३ ग्रॅम वजनाचे २८ हजार रुपए किंमतीचे दागिने पळवून नेले. या प्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.