मुलीसह महिलेने केली आत्महत्या; सहाव्या मजल्यावरून मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 09:48 AM2022-09-18T09:48:45+5:302022-09-18T09:49:14+5:30

सहाव्या मजल्यावरून मारली उडी

Woman commits suicide with daughter; Jump from the sixth floor | मुलीसह महिलेने केली आत्महत्या; सहाव्या मजल्यावरून मारली उडी

मुलीसह महिलेने केली आत्महत्या; सहाव्या मजल्यावरून मारली उडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मीरा रोड : नित्यानंदनगर भागातील सहा मजली इमारतीच्या गच्चीवरून सहा वर्षांच्या मुलीसह महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. रेखा देवासी (२८) आणि अंकिता (वय ६) अशी मृत मायलेकीची नावे आहेत. आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. महिलेच्या पतीने त्यांची पत्नी काही काळापासून मानसिकदृष्ट्या अस्थिर होती, अशी माहिती पाेलिसांना दिली आहे.

मीरा रोडच्या नित्यानंदनगर भागात गौरव गॅलेक्सी फेज १ ही सहामजली इमारत आहे. त्यात सुरेश हरिरामजी देवासी (३१) यांच्यासह रेखा आणि त्यांच्या दाेन मुली राहत हाेत्या. दुसऱ्या मुलीचे नाव पूजा (वय ३) आहे. सुरेश यांचे स्टेशनरीचे दुकान आहे. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास रेखा यांनी मुलगी अंकिता हिच्यासह इमारतीवरून उडी मारली. ही घटना इमारतीच्या रखवालदाराने पाहताच त्यांनी सुरेश यांना कळवले. दोघींना रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी मृत घाेषित केले. 

पोलिसांनी जबाब नोंदविले 
रेखा यांनी अंकिता हिला लिफ्टने सहाव्या मजल्यावर नेले. तेथून त्या गच्चीवर गेल्या. तीन वर्षांच्या दुसऱ्या मुलीला त्यांनी घरीच ठेवले होते. काशिमीरा पोलिसांनी घटनास्थळी व घरात पाहणी केली असून, या प्रकरणी संबंधितांचे जबाब नाेंदवण्यात येत असल्याचे सांगितले. 

पत्नी काही काळापासून मानसिकदृष्ट्या अस्थिर होती, असे महिलेच्या पतीने सांगितले आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.
- संजय हजारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक 

Web Title: Woman commits suicide with daughter; Jump from the sixth floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.