5 वर्षांपासून DSP सोबत संबंध, 50 अश्लील व्हिडीओ; महिला कॉन्स्टेबलला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 11:49 AM2021-09-13T11:49:17+5:302021-09-13T11:50:44+5:30

woman constable arrested for doing obscene act : या महिला कॉन्स्टेबलला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर तिला 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

woman constable arrested for doing obscene act in front of son in swimming pool | 5 वर्षांपासून DSP सोबत संबंध, 50 अश्लील व्हिडीओ; महिला कॉन्स्टेबलला अटक

5 वर्षांपासून DSP सोबत संबंध, 50 अश्लील व्हिडीओ; महिला कॉन्स्टेबलला अटक

googlenewsNext

जयपूर : आपल्या सहा वर्षांच्या मुलासमोर राज्यस्थान पोलिस सेवेतील एका अधिकाऱ्यासोबत अश्लील व्हिडिओ तयार केल्याच्या आरोपाखाली एका निलंबित महिला कॉन्स्टेबलला रविवारी पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने (एसओजी) अटक केली. या महिला कॉन्स्टेबलला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर तिला 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (woman constable arrested for doing obscene act in front of son in swimming pool)

याआधी, या अश्लील व्हिडिओ प्रकरणात निलंबित डीएसपी हिरालाल सैनी याला सुद्धा अटक करण्यात आली होती, त्याला काल 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. एसओजीचे म्हणणे आहे की, महिला कॉन्स्टेबल तिच्या काकांच्या निवासस्थानी कलवार भागात होती. तिला पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली अटक करण्यात आली असून तिची चौकशी केली जात आहे.

सूत्रांनी सांगितले की, व्हिडीओ क्लिप 10 जुलै रोजी महिला कॉन्स्टेबलच्या मोबाइलवरून अजमेर जिल्ह्यातील पुष्कर शहरातील एका आलिशान रिसॉर्टमध्ये काढण्यात आली होती. हिरालाल सैनी अजमेर जिल्ह्यात ब्यावर सर्कल अधिकारी म्हणून तर महिला कॉन्स्टेबल जयपूरमध्ये तैनात होती. 10 जुलै रोजी महिला कॉन्स्टेबलच्या आठ वर्षांच्या मुलाचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी हिरालाल सैनी आणि महिला कॉन्स्टेबल मुलासह रिसॉर्टमध्ये गेले होते. यावेळी मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर दोघांनी स्विमिंग पूलमध्ये अश्लील व्हिडिओही शूट केले. 


डीएसपी 17 दिवसांची पोलीस कोठडी
न्यायालयाने निलंबित डीएसपीला 17 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. पॉक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश रेखा शर्मा यांनी एसओजीच्या मागणीवरून पोलीस कोठडी दिली आहे. एसोजी म्हणणे होते की, ज्या प्रकारचे व्हिडीओ बाहेर आले आहेत, त्यावरून बरीच गुपिते अजून उघड होणे बाकी आहे. तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले की, निलंबित डीएसपीचे हावभाव पाहून असे वाटते की त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप नाही. एसओजीच्या चौकशी दरम्यान, निलंबित डीएसपी सैनी आणि महिला कॉन्स्टेबल यांच्यात सुमारे 5 वर्षांपासून संबंध असल्याचे आढळून आले आहे. या नात्यामुळे महिला कॉन्स्टेबलने आपल्या पतीला सोडले होते.

ब्लॅकमेल करण्यासाठी महिला कॉन्स्टेबल बनवत होती व्हिडीओ - सैनी
आरोपी सैनीने एसओजीला सांगितले आहे की, महिला कॉन्स्टेबलकडे असे 50 हून अधिक व्हिडिओ आणि फोटो आहेत आणि ती भविष्यात त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी हे सर्व करत होती. 10 जुलै रोजी बनवलेला हा व्हिडिओ ती तिच्या मोबाईल फोल्डरमध्ये सेव्ह करत होती, पण तो चुकून व्हॉट्सअॅप स्टेटसवर सेव्ह झाला. जो महिला कॉन्स्टेबलच्या सासरच्या मंडळींनी पाहिला आणि तिथून तो व्हायरल झाला.

Web Title: woman constable arrested for doing obscene act in front of son in swimming pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.