बापरे! सहा वर्षांपासून मुल नाही, सुनेवर दीरासोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 11:45 AM2021-08-19T11:45:18+5:302021-08-19T11:49:54+5:30

Crime News: पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले की, गंभीरता पाहून महिलेची तक्रार नोंद करण्याचे आदेश पोलीस ठाण्याला दिले आहेत. तसेच महिलेची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेशही दिले आहेत. आरोपींना अटक केली जाईल. 

woman did not have children from 6 years of marriage; pressure for sexual relation with Brother in law | बापरे! सहा वर्षांपासून मुल नाही, सुनेवर दीरासोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव

बापरे! सहा वर्षांपासून मुल नाही, सुनेवर दीरासोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव

googlenewsNext

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नानंतर सहा वर्षे झाली तरी मुल होत नसल्याने महिलेला तिच्या दिरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली आहे. यास नकार दिल्याने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये चाकू घुसवल्याचा प्रकार घडला आहे. (woman did not have children from 6 years of marriage; pressure for sexual relation with Brother in law)

कुटुंबियांच्या या त्रासाला कंटाळून महिला पोलीस अधीक्षकांकडे गेली आणि आपबीती सांगितली. सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते, परंतू मूल न झाल्याने सासरचे लोक त्रास देत होते. तसेच दीरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होते. जेव्हा मी यास विरोध केला तेव्हा दीराने रात्रीच्या वेळी येऊन बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही विरोध केला तेव्हा प्रायव्हेट पार्टमध्ये चाकू घुसविला, अशी तक्रार या पीडित महिलेने केली आहे. 

महिलेनुसार या त्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी ती काही दिवस माहेरी गेली होती. पुन्हा सासरी आली. तिथे गेल्यावर पुन्हा त्रास देण्यास सुरुवात झाली. हा त्रास वाढू लागला. एक दिवस महिला तिच्या खोलीत झोपली होती, तेव्हा दीर अचानक तिच्या खोलीत आला आणि जबरदस्तीने शरीर संबंध ठेवू लागला. कशीबशी सुटका करून घेत तिने भावाचे घर गाठले. यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. 

पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले की, गंभीरता पाहून महिलेची तक्रार नोंद करण्याचे आदेश पोलीस ठाण्याला दिले आहेत. तसेच महिलेची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेशही दिले आहेत. आरोपींना अटक केली जाईल. 
 

Web Title: woman did not have children from 6 years of marriage; pressure for sexual relation with Brother in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.