भयानक! स्वतःला आगीत पेटवून पोलीस स्थानकावर पळालेल्या महिलेचा इस्पितळात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 11:00 PM2022-01-07T23:00:02+5:302022-01-08T13:20:56+5:30

हीमाचल प्रदेशहून दक्षिण गोव्यातील वास्कोत आलेल्या सुमारे ४५ वर्षीय मंजू सिंग नावाच्या महीलेने भयानक पद्धतीने केलेल्या आत्महत्येचा प्रयत्न पाहून वास्को पोलीस कर्मचारी बरेच हादरले.

Woman dies at hospital after setting herself on fire | भयानक! स्वतःला आगीत पेटवून पोलीस स्थानकावर पळालेल्या महिलेचा इस्पितळात मृत्यू

भयानक! स्वतःला आगीत पेटवून पोलीस स्थानकावर पळालेल्या महिलेचा इस्पितळात मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

वास्को: हीमाचल प्रदेशहून दक्षिण गोव्यातील वास्कोत आलेल्या सुमारे ४५ वर्षीय मंजू सिंग नावाच्या महीलेने भयानक पद्धतीने केलेल्या आत्महत्येचा प्रयत्न पाहून वास्को पोलीस कर्मचारी बरेच हादरले. गुरूवारी मध्यरात्रीनंतर १२ च्या सुमारास मंजूने पोलीस स्थानकाबाहेर उभे राहून स्वताला आगीने पेटवून घेतल्यानंतर ती पोलीस स्थानकाच्या आत पळत गेली असता पोलीसांनी त्वरित धाव घेऊन तिला लागलेली आग विझवून नंतर उपचारासाठी इस्पितळात पाठवले.

आगीत भाजल्याने गंभीररित्या जखमी झालेली मंजू हीच्यावर गोमॅकॉ इस्पितळात उपचार चालू असताना शुक्रवारी (दि.७) दुपारी तिचा मृत्यू झाला. मंजूने अशा भयानक पद्धतीने आत्महत्या का केली याचे कारण पोलीसांनी तपशील चौकशी केल्यानंतरच उघड होणार असलेतरी तिचा उत्तर गोव्यात असलेल्या एका मित्राशी वाद निर्माण झाल्यानंतर तिने हे पाऊल उचलल्याची सद्या चर्चा चालू आहे.

वास्को पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार हिमाचल प्रदेश येथील मंजू ही महीला २९ डीसेंबर रोजी गोव्यात आली होती. तिचा उत्तर गोव्यात समीर खान नावाचा एक मित्र असून गुरूवारी संध्याकाळी त्यांने तिला वास्कोत आणून सोडल्यानंतर तो तेथून निघून गेला. समीर मंजूला सोडून गेल्यानंतर तिने वास्कोत राहणाºया तिच्या अन्य एका परिचयाच्याला संपर्क करून त्याला बोलवून घेतले. नंतर त्या व्यक्तीने मंजूला राहण्यासाठी वास्कोतील एक हॉटेल (वास्को पोलीस स्थानकापासून सुमारे २५० मीटर अंतरावर) दाखविल्यानंतर तीने तेथे राहण्यासाठी कमरा घेतला.

गुरूवारी रात्री ११ च्या सुमारास मंजूने प्रथम वास्को पोलीस स्थानकावर जाऊन तिचा मित्र समीर गायब असल्याचे पोलीसांना सांगायला सुरू केले. तसेच त्याच्या जीवाला धोका असू शकतो अशी भिती मंजूने व्यक्त करून त्याच्या मोबाईलवर संपर्क होत नसल्याचे तिने पोलीसांना कळविले. मंजूने पोलीसांसमोर अशा प्रकारची भिती व्यक्त केल्यानंतर पोलीसांनी समीरला संपर्क केला असता त्याचा संपर्क झाला. त्यानंतर पोलीसांनी मंजूला समीरशी बोलण्यास दिल्याची माहीती सूत्रांनी दिली. मंजू समीरशी बोलल्यानंतर तो ठीक असल्याचे समाधान तिला झाल्यानंतर तिने पोलीस स्थानकावरून जाण्यास पसंत केले. रात्री सुमारे ११.४० च्या सुमारास मंजू पोलीस स्थानकावरून निघून गेली. त्यानंतर गुरूवारी मध्यरात्रीनंतर १२. ०५ च्या सुमारास मंजू पुन्हा पोलीस स्थानकाबाहेर येऊन पोचली. त्यानंतर तिने स्व:ताला आगीने पेटवून ती पोलीस स्थानकाच्या आत पळाली.

एक महीलेला आग लागून ती पोलीस स्थानकाच्या आत पळत येत असल्याचे ‘ड्युटीवरील’ पोलीस अधिकारी आणि शिपायांना दिसून येताच त्यांनी धाव घेऊन तिला लागलेली आग त्वरित विझवली. त्या घटनेत मंजू गंभीररित्या जखमी झाल्याचे पोलीसांना दिसून आले. पोलीसांनी वेळ न दवडता त्वरित गंभीररित्या जखमी झालेल्या मंजू सिंग हीला पोलीसांच्या वाहनात उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेले. मात्र तिची प्रकृती एकदम गंभीर असल्याने नंतर तेथून तिला पुढच्या उपचारासाठी बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात नेण्यात आले. दरम्यान इस्पितळात उपचार घेताना शुक्रवारी दुपारी मंजूचा मृत्यू झाल्याची माहीती पोलीसांकडून प्राप्त झाली. मंजूने स्व:तावर पेट्रोल ओतून आग लावल्याचा संशय पोलीसांना असून खरोखरच तिने पेट्रोल ओतून आग लावली की अन्य कुठल्या तेलाचा वापर केला याचा पोलीस तपास करित आहे. आग लावण्यासाठी वापरलेले पेट्रोल अथवा अन्य तेल तिने कुठून आणले याची चौकशी केली जात आहे. हिमाचल प्रदेश येथील मंजू सिंग हीला एक विवाहीत मुलगा आणि विवाहीत मुलगी असल्याची माहीती पोलीसांकडून प्राप्त झाली. काही काळापूर्वी तिच्या पतीचा मृत्यू झाल्याची माहीती पोलीसांनी दिली.

मंजूने अशा प्रकारे भयानकरित्या आत्महत्या का केली याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. मंजूचा उत्तर गोव्यात असलेला समीर नामक मित्राशी काही विषयावरून वाद निर्माण झाल्याने तिने आत्महत्या करण्याचा कठोर निर्णय घेतल्याची चर्चा पोलीस सूत्रांत होत असून याबाबत पोलीसांकडून योग्यरित्या चौकशी केल्यानंतरच नेमके कारण उघड होण्याची शक्यता आहे. ज्यावेळी मंजूने स्व:ताला आग लावून पेटवून घेतले त्यावेळी ती दारूच्या नशेत होती काय असा प्रश्नही पोलीसांसमोर उपस्थित झालेला असून त्याबाबतही चौकशी केली जाणार असल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली. वास्को पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करित आहेत. 

Web Title: Woman dies at hospital after setting herself on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :firegoaआगगोवा