"सॉरी मम्मी-पप्पा, मी इतका ताण सहन करू शकत नाही..."; डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 10:51 AM2023-01-05T10:51:10+5:302023-01-05T10:53:16+5:30

भोपाळमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका ज्युनिअर डॉक्टरने टोकाचं पाऊल उचललं

woman doctor Ends life note hostel overdose medicine in bhopal | "सॉरी मम्मी-पप्पा, मी इतका ताण सहन करू शकत नाही..."; डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल

"सॉरी मम्मी-पप्पा, मी इतका ताण सहन करू शकत नाही..."; डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल

googlenewsNext

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका ज्युनिअर डॉक्टरने टोकाचं पाऊल उचललं. गांधी मेडिकल कॉलेजमधील एका डॉक्टरने हॉस्टेलच्या खोलीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्युनिअर डॉक्टर मेडिकल कॉलेजमधील पीडियाट्रिक विभागात पीजी करत होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा माहेश्वरी असं आत्महत्या करणाऱ्या ज्युनियर डॉक्टरचं नाव आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेनंतर हॉस्टेलमध्ये शोककळा पसरली आहे. याबाबत मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. बुधवारीसकाळी डॉ. आकांक्षा माहेश्वरी तिच्या खोलीत होती. सायंकाळी हॉस्टेमधील इतर मुलींनी आकांक्षा यांची खोली बंद असल्याचं पाहिलं.

मुलींनी याबाबत वॉर्डनला माहिती दिली. बराच वेळ दार ठोठावल्यानंतरही दरवाजा न उघडल्याने पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी दार उघडले तेव्हा डॉ. आकांक्षा बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडल्याचं दिसलं. तिला तपासलं तेव्हा तिचा आधीच मृत्यू झालेला होता. आकांक्षाच्या खोलीतून पोलिसांना बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन सापडलं. त्यामुळे आकांक्षाने औषधाचा ओव्हरडोज घेऊन आत्महत्या केल्याची भीती व्यक्त होत आहे.

पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे. ज्यामध्ये आकांक्षाने लिहिले आहे की, "मी इतकी मजबूत नाही, मी इतका ताण सहन करू शकत नाही. मम्मी-पप्पा सॉरी, मित्रांनाही सॉरी. प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. मी स्ट्रॉन्ग नाही. वैयक्तिक कारणांमुळे मी हे पाऊल उचलत आहे". ज्युनिअर डॉक्टर आकांक्षा माहेश्वरी मूळची ग्वाल्हेरची असून गजराजा मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर ती सध्या भोपाळच्या गांधी मेडिकल कॉलेजमधून पीडियाट्रिक विभागात पीजी करत होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: woman doctor Ends life note hostel overdose medicine in bhopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.