नणंदेच्या नवऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडाली; तिसऱ्या लग्नासाठी कुटुंबातील ९ जणांना विष देऊन पसार झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 04:02 PM2021-03-29T16:02:15+5:302021-03-29T16:04:15+5:30
कुटुंबातल्या सदस्यांवर ग्वाल्हेरच्या रुग्णालयात उपचार सुरू; घटनेमुळे गावात एकच खळबळ
भिंड: नणंदेच्या नवऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या एका महिलेनं स्वत:च्याच कुटुंबातील ९ जणांना जेवणातून विष दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशातल्या भिंड जिल्ह्यात हा प्रकार घडला. कुटुंबातील सदस्यांना जेवणातून विष दिल्यावर महिला प्रियकरासोबत पळून गेली. सध्या कुटुंबातल्या सदस्यांवर ग्वाल्हेरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
भाजपा मंत्र्यास दोनदा नडलेल्या IPS अधिकारी असलेल्या तिने ३ नोकऱ्यांवर सोडले पाणी, जाणूया कोण आहे संगिता कालिया
बरासो पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सिमार गावात वास्तव्यास असलेल्या रेश्मा नावाच्या महिलेचे तिच्या नणंदेचा नवरा लोहकन खानशी प्रेम संबंध होते. मात्र सासरची मंडळी त्यांच्यासाठी अडथळा ठरत होती. त्यामुळे प्रेमसंबंधांत आडकाठी करणाऱ्या सासरच्या मंडळींना संपवण्यासाठी रेश्मानं जेवणात विष मिसळलं. त्यानंतर रेश्मा आणि लोहकन खान पळून गेले.
लज्जास्पद! बलात्कार पीडितेला नातेवाईकांकडून बेदम मारहाण; आरोपीसोबत दोरखंडाने बांधून काढली धिंड
रेश्माच्या पहिल्या मृत्यूचा मृत्यू झाला. रेश्माचा दुसरा विवाह तिच्या लहान दीराशी झाला. यानंतर रेश्मा आणि तिच्या नणंदेचा पती लोहकन खान यांचं सूत जुळलं. रेश्माच्या सासरच्या व्यक्तींचा या संबंधांना विरोध होता. त्यामुळे रेश्मा आणि लोहकननं एक योजना आखली. सासरच्या सर्व मंडळींना संपवण्यासाठी रेश्मानं जेवणात विष मिसळलं. विष मिसळण्यात आलेलं जेवण जेवल्यानंतर सगळेच बेशुद्ध पडले. यानंतर रेश्मा आणि लोहकन यांनी घरातून पळ काढला.
शेजारच्यांना रेश्माच्या घरातून अनेक तास कोणाचाही आवाज आला नाही. त्यामुळे त्यांना शंका आली. शेजारी घर पोहोचताच सगळे जण बेशुद्धावस्थेत आढळून आले. शेजारच्या व्यक्तींनी याची माहिती तातडीनं पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. सर्वांना उपचारांसाठी मेहगाव रुग्णालयात नेण्यात आलं. परिस्थिती गंभीर असल्यानं मग सगळ्यांना ग्वाल्हेरमधील रुग्णालयात हलवण्यात आलं.