बाबो! विवाहित असूनही 'त्याने' दुसरं लग्न केलं; 7 वर्षांनी FB पोस्टने बिंग फुटलं; अशी झाली पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 12:01 PM2021-08-17T12:01:38+5:302021-08-17T12:09:35+5:30
Woman exposed husband traced her second wife by facebook : एका महिलेला लग्नानंतर अनेक वर्षांनी तिचा पती आधीपासूनच विवाहित असल्याचं समजलं आहे.
प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका महिलेला लग्नानंतर अनेक वर्षांनी तिचा पती आधीपासूनच विवाहित असल्याचं समजलं आहे. पतीने तिला गेल्या अनेक वर्षांपासून अंधारात ठेवलं होतं. मात्र त्याच्या एका छोट्याशा चुकीमुळे त्याचंच बिंग फुटलं आहे. लंडनमध्ये ही घटना घडली आहे. मारिया गुइलेन गार्सिया (Maria Guillen Garcia) नावाच्या महिलेला तिचा पती टॉम मॅककेबे (Tom McCabe) तिच्यासोबत प्रामाणिक नसल्याचा संशय होता.
काही दिवसांनी महिलेचा हा संशय आणखीच वाढला जेव्हा तिने आपल्या पतीच्या फोनमध्ये एका कुटुंबाचे फोटो पाहिले तेव्हा तिला याची खात्री झाली. तिने यानंतर तपास करायला सुरुवात केली. द सनने दिलेल्या वृत्तानुसार, मारियाची मॅककेबेसोबत भेट 2009 मध्ये झाली होती. नऊ महिन्यांच्या ओळखीनंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली. मात्र जेव्हा ती हे लग्न रजिस्टर करण्यासाठी ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा नवरदेव गायब होता. नंतर विचारणा केली असता त्यानं म्हटलं, की मला तुझ्यासाठी काही फुलं घ्यायची होती. त्यामुळे मी बाहेर गेलो होतो.
सात वर्षांनंतर आता मारियाला मॅककेबे त्यावेळी कुठे गेला होता आणि तो का घाबरला होता. तो आधीपासूनच विवाहित होता आणि हे मारियाला माहिती होऊ नये यासाठी तो रजिस्टर ऑफिसमधून गायब झाला होता हे माहिती झालं. मॅककेबचं सत्य तेव्हा समोर आलं जेव्हा मारिया त्याचा फोन घेऊन सॉफ्टवेअर अपडेट करत होती. याचदरम्यान तिनं तिच्या पतीच्या फेसबुकवर त्याच्या पहिल्या कुटुंबाचे फोटो पाहिले आणि तिला समजलं की त्यानं आपल्या पहिल्या पत्नीसोबत घटस्फोटही घेतला नव्हता. त्यांची 23 वर्षांची एक मुलगीदेखील आहे.
पहिली पत्नी आणि मारिया यांनी फेसबुकवर चॅटिंग केली आणि मॅककेबेची पोलखोल झाली. याप्रकरणी पोलिसांनी 2016 साली मॅककेबे याची चौकशी केली मात्र तो फरार झाला. मात्र, आता तो पकडला गेला असून त्यानं कोर्टात दोन पत्नी असल्याचं मान्य केलं आहे. या प्रकरणी आता त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे. पहिली पत्नी असतानाही दुसरं लग्न केल्याप्रकरणी त्याला सात वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. आता मारियाने मॅककेबे याला घटस्फोट दिला आहे. तिनं सांगितलं, की त्याच्या पहिल्या पत्नीसोबत आणि मुलीसोबत माझं फेसबुकवर बोलणं झालं आहे, त्यानं आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बाबो! लग्नाच्या 8 वर्षांनंतर एका मुलीची आई पडली प्रेमात; पतीने पत्नीचं लावलं दुसरं लग्न, नातेवाईक झाले हैराण#marriage#husband#Wifehttps://t.co/xTBiqOtrYu
— Lokmat (@MiLOKMAT) August 14, 2021