ऑनलाइन लूडो खेळताना विवाहित महिला पडली पाकिस्तानी तरूणाच्या प्रेमात, बॉर्डर पार करून जाणार होती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 12:12 PM2022-01-08T12:12:37+5:302022-01-08T12:13:38+5:30
महिला इथे अटारी जाण्यासाठी रिक्षावाल्याला विचारपूस करत होती. तेव्हाच पोलिसांना संशय आला आणि तिची चौकशी केल्यावर सगळं काही समोर आलं.
राजस्थानच्या (Rajasthan) धौलपूर जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक विवाहित महिला ऑनलाइन लूडो खेळता खेळता पाकिस्तानातील अली नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. इतकंच नाही तर सासर आणि आपल्या मुलांना सोडून महिला पाकिस्तानला जायला निघाली होती. पण पोलिसांनी तिला जालियांवाला बाग भागात पडकलं. महिला इथे अटारी जाण्यासाठी रिक्षावाल्याला विचारपूस करत होती. तेव्हाच पोलिसांना संशय आला आणि तिची चौकशी केल्यावर सगळं काही समोर आलं.
विवाहित महिला पाकिस्तानी तरूणाच्या पडली प्रेमात
महिलेला पकडल्यानंतर तिच्या नातेवाईकांना अमृतसरला बोलवण्यात आलं आणि तिला त्यांच्याकडे सोपवण्यात आलं. महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिची ६ महिन्याआधी लूडो खेळताना पाकिस्तानातील तरूण अलीसोबत मैत्री झाली. ज्यानंतर ते व्हॉट्सअॅपवर बोलू लागले होते. पाकिस्तानी तरूणाने महिलेला भेटण्यासाठी अटारी बॉर्डरवर बोलवलं होतं. पाकिस्तानी तरूणान तिला सांगितलं होतं की, तू अटारी बॉर्डरपर्यंत पोहोच, तिथून त्याचा मित्र तिला पाकिस्तानात घेऊन येईल.
प्रेमात हरवलेली महिला कुटुंबाला सोडून पाकिस्तानला जाण्यासाठी निघाली. ती जलियांवाला बागला पोहोचून रिक्षावाल्याला अटारीला जाण्याबाबत विचारत होती. यावेळी अमृतसर पोलिसांना तिच्यावर संशय आला. त्यांनी तिला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. तेव्हा तिने सांगितलं की, तिने ऑनलाइन मैत्रीनंतर पाकिस्तानी तरूणाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना बोलवलं आणि तिच्या त्यांच्याकड सुपूर्द केलं.