शारीरिक संबंधाची मागणी करत होती दीर, वहिनीने उचललं हे धक्कादायक पाउल आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 11:21 AM2023-02-15T11:21:41+5:302023-02-15T11:23:00+5:30

Crime News : महिलेने दीराची हत्या केल्याचं कबूल करत सांगितलं की, पतीच्या निधनानंतर दीर तिच्याकडे शारीरिक संबंधासाठी हट्ट धरत होता. त्याला वैतागून तिने हे पाउल उचललं.

Woman forced to wear a garland made of slippers in Telangana | शारीरिक संबंधाची मागणी करत होती दीर, वहिनीने उचललं हे धक्कादायक पाउल आणि मग...

शारीरिक संबंधाची मागणी करत होती दीर, वहिनीने उचललं हे धक्कादायक पाउल आणि मग...

googlenewsNext

Crime News : तेलंगणाच्या  महबूबाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेला चपलांचा हार घालून तिला गावात फिरवण्यात आलं. महिलेने दोन लोकांसोबत मिळून आपल्या दीराची हत्या केली होती.

महिलेने दीराची हत्या केल्याचं कबूल करत सांगितलं की, पतीच्या निधनानंतर दीर तिच्याकडे शारीरिक संबंधासाठी हट्ट धरत होता. त्याला वैतागून तिने हे पाउल उचललं. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनुसार, सोमवारी सायंकाळी एका महिलेच्या गळ्यात चपलांचा हार घालून तिची धिंड काढण्यात आली. सासरच्या लोकांनी सांगितलं की, महिलेने तिचा दीर राजूची हत्या केली आहे. तेच महिलेने हत्या केल्याचं कबूल केलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिलेची सुटका केली आणि तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले.

महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिच्या पतीचं निधन वर्षाआधी झालं होतं. दीर राजू तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करत होता. दीर म्हणत होता की, मी तुझा सांभाळ करतो, त्यामुळे त्याची ईच्छा पूर्ण करावी. तो रोज यासाठी त्रास देत होता. त्यामुळे मी दोन लोकांच्या मदतीने त्याची हत्या केली. त्याचा मृतदेह गावात दफन केला.

बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राजूचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी त्याची ओळख पटवली तर तो शेजारच्या गावातील राजू होता. पोलिसांनी चौकशी केली. यादरम्यान त्याच्या वहिनीवर सासरच्या लोकांनी आणि गावातील लोकांनी राजूच्या हत्येचा संशय व्यक्त केला. त्यानंतर तिला चपलेचा हार घालून तिची धिंड काढली होती. पोलिसांनी महिलेला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title: Woman forced to wear a garland made of slippers in Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.