शौचास गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार; २ आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 09:33 PM2021-05-22T21:33:00+5:302021-05-22T21:34:45+5:30
Woman gang raped : पीडित महिला तिच्यावर झालेल्या या अमानुष कृत्याबद्दल तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला गेली तेव्हा या घटनेचा चुकीचा अहवाल पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.
बिहारमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. दरम्यान, बिहारमधील औरंगाबादमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना गोह पोलीस स्टेशन परिसरातील आहे. पीडित महिलेने सांगितले की, ती शौचासाठी घराबाहेर गेली असता गावातील दोन तरुणांनी ही घटना घडवून आणली.
पीडित महिला तिच्यावर झालेल्या या अमानुष कृत्याबद्दल तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला गेली तेव्हा या घटनेचा चुकीचा अहवाल पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. पीडितेचे कुटुंबीय सांगतात की, महिलेने पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे.
फरार रेती तस्करांच्या अटकेसाठी एसपींचा दोन दिवसांचा ‘अल्टिमेटम’https://t.co/PtTJRPb9Fp
— Lokmat (@MiLOKMAT) May 22, 2021
असे असूनही पोलिस ठाण्याचे प्रमुख शमीम अहमद यांनी बलात्काराऐवजी केवळ बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ग्रामस्थ संतप्त झाले. पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने पोलिस स्टेशनच्या प्रमुख पदावरून हटविण्याची मागणी लोकांनी केली.
बापरे! कोरोनाने मृत्यू झालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीhttps://t.co/8IC5Cz24uJ
— Lokmat (@MiLOKMAT) May 22, 2021