"ना तुझ्याकडे राहणार ना माझ्याकडे": पतीशी वाद होताच आईचा टोकाचा निर्णय, लेकीसोबत...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 11:41 AM2022-11-28T11:41:11+5:302022-11-28T11:45:44+5:30

पतीला मला घराबाहेर काढायचं होतं आणि मुलीला स्वत:जवळ ठेवायचं होतं. यावरून आमच्यात वाद झाला.

woman killed her innocent daughter in bijnor uttar pradesh | "ना तुझ्याकडे राहणार ना माझ्याकडे": पतीशी वाद होताच आईचा टोकाचा निर्णय, लेकीसोबत...

फोटो - आजतक

Next

उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका निष्पाप जीवाची हत्या करण्यात आली आहे. पतीसोबतच्या वादातून एका महिलेने आपल्या पोटच्या मुलीची हत्या केली. अवघ्या दीड वर्षाच्या लेकीला संपवलं. महिलेच्या पतीने तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती अंकित कुमार सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहे. पश्चिम बंगालमध्ये तैनात असलेले अंकित कुमार सुट्टी असल्याने काही दिवसांसाठी घरी आले होते. त्याच दरम्यान पत्नी शिवानीने दीड वर्षांच्या दृष्टीची गळा दाबून हत्या केल्याची माहिती अंकित यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे. 

पोलिसांनी केलेल्या चौकशीत पतीशी वाद सुरू असल्याचं महिलेने सांगितलं. पतीला मला घराबाहेर काढायचं होतं आणि मुलीला स्वत:जवळ ठेवायचं होतं. यावरून आमच्यात वाद झाला. ना ती तुझ्याजवळ राहील ना माझ्याजवळ असं म्हणत मी माझ्याच मुलीचा गळा दाबल्याची कबुली आरोपी महिलेने दिली.

आरोपी शिवानीचे अन्य व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध आहेत. त्यामुळेच तिने हे कृत्य केल्याचा आरोप सासरच्यांनी केला. शिवानी आणि अंकित यांचं हे दुसरं लग्न होतं. शिवानीने आधीच्या लग्नातही अशाच प्रकारचं कृत्य केल्याचा दावा तिच्या सासरच्या लोकांनी केला. सासरे बेगराज सिंह यांनी शिवानीने दीड महिन्यांच्या मुलीला मारल्याचं म्हटलं आहे. याआधीही तिच्या पाच महिन्यांच्या मुलीला अशाच प्रकारे मारल्याचं सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: woman killed her innocent daughter in bijnor uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.