नागपुरात दुचाकी पार्क करण्याच्या क्षुल्लक कारणावरून महिलेची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 07:01 PM2020-06-25T19:01:47+5:302020-06-25T20:34:14+5:30

दुचाकी पार्क करण्याच्या क्षुल्लक कारणावरून निर्माण झालेल्या वादात एका आरोपीने शेजारच्या महिलेची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. नंदनवनमध्ये बुधवारी रात्री ही थरारक घटना घडली.

Woman killed for trivial reason for parking two-wheeler in Nagpur | नागपुरात दुचाकी पार्क करण्याच्या क्षुल्लक कारणावरून महिलेची हत्या

नागपुरात दुचाकी पार्क करण्याच्या क्षुल्लक कारणावरून महिलेची हत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकी पार्क करण्याच्या क्षुल्लक कारणावरून निर्माण झालेल्या वादात एका आरोपीने शेजारच्या महिलेची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. नंदनवनमध्ये बुधवारी रात्री ही थरारक घटना घडली.
आरती नितीन गिरडकर (वय ३४) असे मृत महिलेचे नाव असून आरोपीचे नाव बंडू ऊर्फ एकनाथ प्रेमराज टापरे (वय २९) आहे.
बुधवार रात्री ९.३० च्या सुमारास केडीके कॉलेज मार्गावरील नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं. ५ मध्ये राहणारे नितीन नारायण गिरडकर (वय ४२) यांची पत्नी आरती आपली दुचाकी घराजवळ पार्क करीत असताना शेजारी राहणारा आरोपी बंडू ऊर्फ एकनाथ प्रेमराज टापरे याने आक्षेप घेत शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे वाद वाढला. आरती यांनी जशास तसे उत्तर दिल्यामुळे आरोपी बंडू टापरे याने आरती यांच्याकडे धाव घेतली. त्यांना आरोपीने चाकूने भोसकले. खांद्यावर, छातीवर, पोटावर मारून आरोपीने त्यांची निर्घृण हत्या केली. आरडाओरड ऐकून आरती यांचे पती नितीन आणि शेजारी धावले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात मोठा थरार निर्माण झाला. माहिती कळताच नंदनवन पोलिसांचा ताफा पोहचला. नितीन यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी टापरेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

नेहमीच उडायचे खटके
नितीन गिरडकर लाऊडस्पीकरचा व्यवसाय करतात. आरोपी टापरेकडे छोटा हाथी वाहन असून ते त्याने महापालिकेत भाड्याने दिले आहे. गिरडकर आणि टापरेमध्ये किरकोळ कारणावरून नेहमीच खटके उडत होते. मात्र, प्रकरण अशा भयंकर वळणावर जाईल, असा कुणी विचारही केला नव्हता.

आरोपीला  न्यायालयात हजर करणार
नंदनवन पोलिसांनी गुरुवारी आरोपी टापरे याची दिवसभर चौकशी केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करून त्याचा पीसीआर मागितला जाणार आहे.

Web Title: Woman killed for trivial reason for parking two-wheeler in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.