Girlfriend ने केली Boyfriend ची गळा चिरून हत्या, दुसऱ्या महिलेसोबत फोनवर बोलणं पडलं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 16:00 IST2021-04-29T15:53:27+5:302021-04-29T16:00:57+5:30
Crime News : ही घटना सोमवारी सायंकाळी सीतापूर जवळच्या लहरपूरमध्ये झाली. ३५ वर्षीय आरोपी रजनीने तिच्या २८ वर्षीय बॉयफ्रेन्ड राजेशची निर्दयीपणे हत्या केली.

Girlfriend ने केली Boyfriend ची गळा चिरून हत्या, दुसऱ्या महिलेसोबत फोनवर बोलणं पडलं महागात!
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh Crime) सीतापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गर्लफ्रेन्डने तिच्या बॉयफ्रेन्डची हत्या (Girlfriend Killed Boyfriend) केली आहे. कारण तिने बॉयफ्रेन्डला एका दुसऱ्याच महिलेसोबत बोलताना ऐकलं. एवढ्या कारणाने या गर्लफ्रेन्ड कशाचाही विचार न करता बॉयफ्रेन्डचा जीव घेतला. पोलिसांनी आरोपी गर्लफ्रेन्ड विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीनेही आपला गुन्हा कबूल केला आहे.
दुसरीसोबत बोलता होता बॉयफ्रेन्ड
ही घटना सोमवारी सायंकाळी सीतापूर जवळच्या लहरपूरमध्ये झाली. ३५ वर्षीय आरोपी रजनीने तिच्या २८ वर्षीय बॉयफ्रेन्ड राजेशची निर्दयीपणे हत्या केली. राजेशची चूक फक्त इतकीच होती की, एका दुसऱ्या महिलेसोबत फोनवर बोलत होता. याचा तिला राग आला आणि तिने त्याची हत्या केली. (हे पण वाचा : दिल्लीच्या २९ वर्षीय 'ड्रग क्वीन' चा वेदनादायी अंत, जीव जाईपर्यंत चौथ्या पतीने झाडल्या तिच्यावर गोळ्या...)
चाकूने गळा चिरला
लहरपूरचे एसएचओ आर.एस.द्विवेदी म्हणाले की, आरोपी महिलेने दोनदा आपल्या बॉयफ्रेन्डला विचारले की, तू फोनवर बोलत होता ती महिला कोण होती. पण त्याने सांगण्यास नकार दिला. यानंतर आरोपी संतापली आणि तिने आपल्या बॉयफ्रेन्डचा गळा चाकूने चिरला.
एसएचओ म्हणाले की, 'गर्लफ्रेन्डच्या हल्ल्यानंतर राजेश जमिनीवर पडला आणि त्याचं रक्त वाहू लागलं होतं. त्यानंतर गावातील लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केली. पण तोपर्यंत त्याचा जीव गेला होता. डॉक्टरांनी राजेशला मृत घोषित केलं. (हे पण वाचा : भयंकर! आईचा खून करताना पाहिल्यामुळे नराधम बापाने सात वर्षांच्या मुलालाही संपविले)
तीन वर्षापासून सुरू होतं प्रेमप्रकरण
पोलिसांनी सांगितले की, रजनी आणि राजेश गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. राजेश एका दुकानावर काम करत होता. राजेश रजनीसाठी महागडे गिफ्टही आणत होता. एसएचओ पुढे म्हणाले की, 'आरोपी रजनीवर विरोधात मृत राजेशच्या परिवाराच्या तक्रारीवरून हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रजनीला अटक केली आहे. तसेच हत्येसाठी वापरलेला चाकूही पोलिसांनी ताब्यात घेतला'.