प्रियकराची १०८ वेळा चाकूने भोसकून केली होती हत्या, तरीही कोर्टाने केली सुटका; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 03:04 PM2024-01-26T15:04:26+5:302024-01-26T15:04:54+5:30

हत्येचा आरोप सिद्ध झाल्यानंतरही तिची शिक्षा रद्द करण्यात आली आणि तिची सुटका करण्यात आली.

woman knifed boyfriend 108 times weed induced psychosis swerves jail shocking punishment | प्रियकराची १०८ वेळा चाकूने भोसकून केली होती हत्या, तरीही कोर्टाने केली सुटका; कारण...

प्रियकराची १०८ वेळा चाकूने भोसकून केली होती हत्या, तरीही कोर्टाने केली सुटका; कारण...

जगात असे अनेक भयंकर गुन्हे घडले, ज्याबद्दल जाणून घेतल्यास अनेकांच्या मनात धडकी भरते. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी कायद्याने अशा क्रूर गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्याचीही तरतूद आहे. पण, अलीकडेच एक भयंकर घटना समोर आली आहे. एका तरुणीने आपल्या प्रियकराचा निर्घृणपणे खून केला. मात्र, तरीही तिची कायद्याच्या कचाट्यातून सुटका झाली आहे. दरम्यान, ३३ वर्षीय ब्रायन स्पेज्चरचे (Bryn Spejcher) हे प्रकरण वाचून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल.

ब्रायनने २०१८ साली आपल्या प्रियकर ओ'मेलियाची १०८ वेळा चाकूने भोसकून हत्या केली होती. ही घटना जेव्हा घडली, तेव्हा ती मरिजुआना या ड्रग्सच्या नशेत होते. मात्र, धक्कादायक म्हणजे हत्येचा आरोप सिद्ध झाल्यानंतरही तिची शिक्षा रद्द करण्यात आली आणि तिची सुटका करण्यात आली. कोर्टात सर्व आरोप सिद्ध झाल्यानंतरही ब्राइनला चार वर्षांच्या निलंबित तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याने ओ'मेलियाच्या कुटुंबाला धक्का बसला. ब्रायनला प्रोबेशनवर ठेवण्यात आले तसेच, १०० तासांची सामुदायिक सेवा करण्यास सांगितले. 

मारिजुआना ड्रग्जमुळे होणाऱ्या मानसिक विकारांबद्दल जागरुकता निर्माण करण्यास तिला सांगण्यात आले. दरम्यान, निलंबित शिक्षा म्हणजे आरोपी दोषी असूनही त्याला तुरुंगाबाहेर राहता येऊ शकते. एका वृत्तसंस्थेनुसार, डिसेंबर २०२३ मध्ये ब्रायनला दोषी सिद्ध करण्यात आले होते. मात्र, शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर तिच्या प्रियकराच्या कुटुंबीयांनी त्यावर विरोध दर्शवला. मात्र, शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी शिक्षा सुनावण्यापूर्वीचे त्यांचे लॉजिक सगळ्यांना समजावून सांगितले. 

ज्या दिवशी घटना घडली, तेव्हा घटनास्थळी असलेल्या औषधांचा प्रभाव तिच्यावर इतका होता की, त्यामुळे ब्रायन मानसिक स्थिती खालवली होती. तिच्यावर तिचे नियंत्रण नव्हते. पोलिसांच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, महिलेने आपल्या प्रियकरावर चाकुने हल्ला केल्यानंतर स्वतःलाही इजा करण्याचा प्रयत्न केला. प्रियकरावर हल्ला केल्यानंतर ती वेड्यासारखी ओरडत होती आणि शेवटी तिने आपल्या मानेवर चाकूने वार केले. मात्र, या घटनेनंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचल्यामुळे तिचा जीव वाचला आणि त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. 

दरम्यान, ब्रायनला शिक्षा सुनावल्यानंतर ब्राइन तिच्या प्रियकर ओ'मेलियाच्या घरच्यांकडे पाहून खूप जास्त रडत होती. ब्रायनने त्यांना पाहून म्हटलं की, मी तुमच्या कुटुंबाला तोडलं आहे. मी आतून पूर्णपणे तुटून गेले आहे. मी खूप दुखी आहे. मला दुख आहे की तुम्ही चाडला पुन्हा कधी पाहू शकत नाही.

Web Title: woman knifed boyfriend 108 times weed induced psychosis swerves jail shocking punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.