"गर्लफ्रेंडच्या इशाऱ्यावर नाचतो, आता मला जवळही घेत नाही", पोलीस ठाण्यात पतीविरोधात पत्नीचा आक्रोश!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 03:51 PM2022-12-04T15:51:26+5:302022-12-04T15:52:34+5:30

लग्नानंतरही पतीनं त्याच्या गर्लफ्रेंडला सोडलं नाही. गेल्या चार वर्षांपासून तिच्याच इशाऱ्यावर तो नाचतो आहे, अशी तक्रार घेऊन एक पत्नी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि पतीविरोधात आक्रोश सुरू केला.

woman lodge fir of dowry against her husband and his family in agra | "गर्लफ्रेंडच्या इशाऱ्यावर नाचतो, आता मला जवळही घेत नाही", पोलीस ठाण्यात पतीविरोधात पत्नीचा आक्रोश!

"गर्लफ्रेंडच्या इशाऱ्यावर नाचतो, आता मला जवळही घेत नाही", पोलीस ठाण्यात पतीविरोधात पत्नीचा आक्रोश!

googlenewsNext

आग्रा-

लग्नानंतरही पतीनं त्याच्या गर्लफ्रेंडला सोडलं नाही. गेल्या चार वर्षांपासून तिच्याच इशाऱ्यावर तो नाचतो आहे, अशी तक्रार घेऊन एक पत्नी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि पतीविरोधात आक्रोश सुरू केला. ही घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आहे. 

रेखा बेन नावाच्या एक महिलेनं आग्रा येथील पोलीस ठाण्यात पती विनोद विरोधात तक्रार दाखल केली आहे. रेखा बेननं तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, तिचा विवाह विनोद याच्यासोबत २० फेब्रुवारी २०१८ मध्ये झाला. लग्नात तिच्या कुटुंबीयांनी नवरदेवाच्या कुटुंबीयांनी जितकं मागितलं तितकं सगळं दिलं. पण लग्नानंतरही आपला छळ सुरूच होता, असं रेखा हिचं म्हणणं आहे. पती विनोदचे विवाहबाह्य संबंध असून तो आपल्यापासून दूर राहतो. तसंच सासरची मंडळी अजूनही ५ लाख रुपयांचा हुंडा मागून मानसिक छळ करत असल्याची तक्रार रेखा हिनं दिली आहे. 

पती जवळ घेईना
रेखानं आपल्या तक्रारीत म्हटलंय की लग्नाला चार वर्ष उलटून गेली पण पती विनोद अजूनही आपल्याला जवळ घेत नाही. तसंच कुठं फिरायला देखील घेऊन गेलेला नाही. लग्नापासूनच आपल्यापासून तो दूर राहायला लागला ते आजही कायम आहे. विनोद त्याच्या गर्लफ्रेंडच्या इशाऱ्यावर चालतो आणि माझ्याशी बोलत देखील नाही. गर्लफ्रेंड नाराज होणार नाही  ना याची भीती त्याला आहे. त्यामुळे माझ्यासोबत शारीरीक संबंध देखील ठेवले नाहीत, असं पत्नीनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. इतकंच काय तर गर्लफ्रेंड नाराज झाली तर पती काही दिवस जेवत नाही, हेही तिनं पोलिसांना सांगितलं आहे. 

पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद
सासरच्या मंडळींकडून पाच लाख रुपये हुंडा मागितला जात असून त्यासाठी मानसिक आणि शारीरीक छळ केला जात असल्याचाही आरोप रेखा बेन यांनी केला आहे. याची तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतली आहे. तसंच रेखा यांनी सासरच्या मंडळींकडून आपल्या जीवाला धोका असल्याचीही तक्रार दिली आहे. 

रेखाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तिचा पती विनोद, भाऊ, सासऱ्यांचा भाऊ, पतीची गर्लफ्रेंड, सासू माली बेन आणि नणंद दिविया यांच्या विरोधात आयपीसी कलम ४९८अ, ३२३, ५०४, ५०६ आणि गुंडा अधिनियमच्या कलमाअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू असून त्यानुसार कारवाई केली जाई, असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Web Title: woman lodge fir of dowry against her husband and his family in agra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.