ऑनलाईन भाड्याने घर शोधणं पडलं महागात; एका चुकीमुळे गमावली आयुष्यभराची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 11:05 AM2023-08-31T11:05:50+5:302023-08-31T11:12:48+5:30
अनुपम सिंगने पुन्हा फोन करून काही तांत्रिक बिघाडामुळे जुनं पेमेंट फेल झाल्याचं सांगितलं. यानंतर पुन्हा पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं.
सरकारी ते खासगीपर्यंत अनेक कंपन्या ऑनलाईन आहेत आणि तिथून त्यांच्या सेवा घेता येतात. अशा परिस्थितीत आता अनेक कामं घरबसल्या ऑनलाईन करता येणार आहेत. पण असं करणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. बंगळुरू येथील एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणारी महिला ऑनलाईन फसवणुकीची बळी ठरली. तिच्या बँक खात्यातून हजारो रुपये काढण्यात आले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला बऱ्याच दिवसांपासून भाड्याने मिळणाऱ्या फ्लॅटचा शोध घेत होती. यानंतर, 17 ऑगस्ट रोजी, तिने फोटोमधील एक लोकेशन लाइक केलं आणि त्याबद्दल तपशील जाणून घेण्यासाठी क्लिक केलं. यानंतर महिलेने त्या पोस्टमधील मोबाईल क्रमांक पाहून तिला कॉल केला. महिलेचा फोन प्रीतम नावाच्या व्यक्तीला आला आणि त्याने फ्लॅटचा मालक असल्याची ओळख करून दिली. यानंतर फ्लॅट मालकाने सांगितलं की, त्याचा मॅनेजर अनुपम सिंग तिला बोलावेल. तो इत्यादींबाबतही चर्चा करेल आणि संपूर्ण भाडे प्रक्रिया पूर्ण करेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडितेने सांगितले की, तिला सिंग याचा फोन आला होता. यानंतर भाड्यापासून ते डिपॉझिट इत्यादी सर्व गोष्टींबद्दल बोलून सर्व औपचारिकता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पीडितेला आपण ऑनलाईन फसवणुकीला बळी पडणार आहोत हे माहीत नव्हते. यानंतर महिलेने सुरुवातीला 64 हजार रुपये ट्रान्सफर केले. डिपॉझिट भरले पण ते झालं नाही.
अनुपम सिंगने पुन्हा फोन करून काही तांत्रिक बिघाडामुळे जुनं पेमेंट फेल झाल्याचं सांगितलं. यानंतर पुन्हा पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं. यानंतर महिलेला संशय आला. महिलेला संशय आला आणि तिने अनुपम सिंगला काही प्रश्न विचारले. यानंतर त्याने कॉल डिस्कनेक्ट केला. त्यानंतर महिलेला खात्री पटली की ती एका घोटाळ्याची शिकार झाली आहे. हा घोटाळा उघडकीस येताच महिलेने पोलिसांना याची माहिती दिली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.