सावधान! ना OTP शेअर केला, ना बँक डिटेल्स दिले तरीही महिलेने बँक खात्यातून गमावले 5 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 12:12 PM2023-12-10T12:12:50+5:302023-12-10T12:14:27+5:30
एका महिलेने ना बँकेकडून मिळालेला ओटीपी शेअर केला आहे ना बँक डिटेल्स शेअर केले. तरी देखील तिला लाखोंचा फटका बसला आहे.
सायबर स्कॅमच्या रोज नवनवीन घटना समोर येत आहेत. स्कैमर्स लोकांची फसवणूक करण्याचे नवीन मार्ग शोधत आहेत. अतिशय हुशारीने ते लोकांचे बँक डिटेल्स आणि OTP पर्यंत पोहोचतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका महिलेने ना बँकेकडून मिळालेला ओटीपी शेअर केला आहे ना बँक डिटेल्स शेअर केले. तरी देखील तिला लाखोंचा फटका बसला आहे.
चंदिगडमध्ये एका महिलेची 5 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर गुंडांनी तिच्या क्रेडिट कार्डमधून ही रक्कम चोरली आहे. याबाबत महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, महिलेने आपल्या एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डमधून 5 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या क्रेडिट कार्डवरून 4.95 लाख रुपयांचे तीन व्यवहार झाले.
सायबर ठगने महिलेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून ट्रॅव्हल पोर्टलवर दोन पेमेंट केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. महिलेने सांगितलं की, तिने तिचे बँक डिटेल्स कोणाशीही शेअर केले नाही. तसेच ओटीपी देखील शेअर केला नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सायबर फ्रॉडपासून 'असं' राहा सेफ
सायबर स्कॅम किंवा सायबर फ्रॉडपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, तुम्ही तुमचे बँक डिटेल्स आणि बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड तपशील कोणाशीही शेअर करू नका. अनोळखी व्यक्तीने शेअर केलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. ही लिंक तुमच्या फोनमध्ये स्पाई एप्स इन्स्टॉल करू शकते आणि बँक डिटेल्स चोरू शकते. अनेक स्कॅमर मोबाईलचा रिमोट एक्सेस घेतात.