सूत जुळलं! ...म्हणून सुनेने नवऱ्याला सोडलं आणि थेट सासऱ्यासोबत लग्न केलं अन्...; नातेवाईक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 11:13 AM2021-07-06T11:13:05+5:302021-07-06T11:13:54+5:30

Crime News : एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सुनेसोबतच लग्नगाठ बांधली आहे

woman marriage father in law daughter in law husband police up badaun | सूत जुळलं! ...म्हणून सुनेने नवऱ्याला सोडलं आणि थेट सासऱ्यासोबत लग्न केलं अन्...; नातेवाईक हैराण

सूत जुळलं! ...म्हणून सुनेने नवऱ्याला सोडलं आणि थेट सासऱ्यासोबत लग्न केलं अन्...; नातेवाईक हैराण

googlenewsNext

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सुनेसोबतच लग्नगाठ बांधली आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्वतःच्या दोन्ही मुलांना सोडून तो शहरात आपल्या सुनेसोबत राहू लागला. जेव्हा मुलांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला तेव्हा हे प्रकरण समोर आलं. मोठ्या मुलाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बदायू जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली आहे. या घटनेने सर्वच जण हैराण झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, बदायू जिल्ह्यातील कस्बा बिसौली गावातील दबतरा येथील रहिवासी असलेल्या 45 वर्षीय देवानंद याच्या पत्नीचं 2015 मध्ये निधन झालं. यावेळी देवानंदचं वय 39 वर्ष होतं. देवानंदच्या नातेवाईकांनी त्याला दुसरं लग्न करण्याचं सुचवलं. मात्र, देवानंदनं त्यावेळी आपला 15 वर्षीय मुलगा सुमित याचा विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि 2016 मध्ये सुमितचं लग्न लावण्यात आलं. लग्नानंतर सहा महिन्यातच सुमित आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद होऊ लागले. याच कारणामुळे दोघांमध्ये दुरावा आला. याच दरम्यान सुमितच्या पत्नीची आपल्या सासऱ्यासोबत जवळीक वाढली.

2017 साली वडील देवानंद यांच्या एका निर्णयामुळे सुमितचं संपूर्ण आयुष्यच बदललं. देवानंदने सुमितच्या पत्नीसोबत कोर्ट मॅरेज केलं आणि दोघंही संभल जिल्ह्यात जाऊन राहू लागले. या दोघांना एक मुलगाही झाला, तो सध्या एक वर्षाचा आहे. मात्र, या काळात देवानंदनं आपल्या मुलांची जबाबदारीही घेतली होती. सुमितला दारू आणि जुगाराची सवय होती आणि यासाठी लागणारे पैसे तो देवानंद यांच्याकडूनच घेत असे. मात्र, काही काळानंतर त्यांनी मुलाला पैसे देणं बंद केलं. यानंतर वकीलांच्या म्हणण्यानुसार, सुमितनं RTI च्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या पगारासंबंधीची माहिती मागितली.

 

आपली पत्नी हरवल्याने त्याने तिला शोधण्यासाठी पोलिसांतही मदत मागितली.पोलिसांनी याप्रकरणी तपास करताना देवानंद आणि त्याचा मुलगा सुमित यांना ठाण्यात बोलावलं. ठाण्यात सुमित पैसे आणि आपला सांभाळ वडिलांनी करावा अशी मागणी करू लागला. याच कारणामुळे दोघांमध्ये वादही झाले. यानंतर पंचायत बोलावण्यात आली, यात सुमितच्या पत्नीनं आपल्याला सासऱ्यासोबतच राहायचं असल्याचं सांगितलं. तिनं म्हटलं की सासराच तिचा पती असून त्यांनी कोर्ट मॅरेजही केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: woman marriage father in law daughter in law husband police up badaun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.