महिला आमदारासोबत छेडछाड करणाऱ्या व्यक्तीच्या भरसभेत कानशिलात लगावली 

By पूनम अपराज | Published: February 3, 2021 09:04 PM2021-02-03T21:04:43+5:302021-02-03T21:05:12+5:30

Molestation : संतप्त आमदाराने त्यांना उघडपणे कानाखाली आवाज काढला. असे म्हणतात की, भलुई येथे एक फॅन्सी क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता

A woman MLA was slapped in the ear by a man who was harassing her | महिला आमदारासोबत छेडछाड करणाऱ्या व्यक्तीच्या भरसभेत कानशिलात लगावली 

महिला आमदारासोबत छेडछाड करणाऱ्या व्यक्तीच्या भरसभेत कानशिलात लगावली 

Next
ठळक मुद्दे ही घटना 30 जानेवारी रोजी आहे आणि आमदाराने सांगितले की, आपण एसपीला भेटून याप्रकरणी तक्रार करू.

बिहारमधील राजापकरच्या भलुई येथे आयोजित कार्यक्रमात स्थानिक महिलाआमदार प्रतिमा कुमारी यांच्या विनयभंगाची घटना समोर आली आहे. अश्लील कृत्ये करत एक तरुण स्टेजवर चढला आणि त्याने आमदाराची छेड काढण्याचा प्रयत्न केला.

संतप्त आमदाराने त्यांना उघडपणे कानाखाली आवाज काढला. असे म्हणतात की, भलुई येथे एक फॅन्सी क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता आणि आमदारांना या उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महुआ आमदार मुकेश रोशन यांच्यासह परिसरातील अनेक लोक उपस्थित होते, असे आमदार प्रतिमा म्हणाले.


एक माणूस मला सतत अश्‍लील हावभाव करताना दिसला. महिलेने पुढे सांगितले की, तो पुन्हा पुन्हा अश्लील हावभाव करत होता. यानंतर मी माझी नजर हटवली, पण तेव्हा त्याने स्टेजवर चढून माझी छेड काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या व्यक्तीने मर्यादा ओलांडली. यानंतर मला ते सहन करणे कठीण झाले आणि व्यासपीठावरून खाली आल्यानंतर त्या व्यक्तीच्या कानाखाली लगावून दिली. ही घटना 30 जानेवारी रोजी आहे आणि आमदाराने सांगितले की, आपण एसपीला भेटून याप्रकरणी तक्रार करू.

त्या म्हणाल्या की, नक्कीच ही व्यक्ती माझ्या क्षेत्राची आहे, परंतु त्याच्या कृतींमुळे समाजातील महिलांविषयी लोकांचा विचार दिसून येतो. प्रतिमा कुमारी पुढे म्हणाल्या की, या घटनेनंतर काही लोकांनी फोन करून सांगितले की, लोकांनी तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिले ते लोकांच्या कानाखाली मारण्यासाठी नाही. यावर महिला आमदार म्हणाल्या की, दुर्दैवी घटनेपेक्षा वाईट या गोष्टीचं वाटलं ते म्हणजे ज्या व्यक्तीने कॉल केला त्याची मानसिकता, विचाराबाबत. आरोपीला अपमानित करत असल्याचे सांगून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर महिला आमदार म्हणाल्या की, कोणीतरी कॉल करून आरोपी चार मुलांचा पिता आहे, अशी माहिती दिली. 

Web Title: A woman MLA was slapped in the ear by a man who was harassing her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.