आधी भाल्याने डोक्यावर केला हल्ला मग शॉक दिला, सूनेने सासूची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 09:33 AM2023-02-28T09:33:15+5:302023-02-28T09:33:32+5:30

Crime News : सासू संपवण्यासाठी सूनेने आधी तिच्या डोक्यावर भाल्याने हल्ला केला. नंतर तिला शॉक देऊन तिची हत्या केली. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला भाला ताब्यात घेतला आहे.

Woman murder her mother in law by electrocution her in Amritsar | आधी भाल्याने डोक्यावर केला हल्ला मग शॉक दिला, सूनेने सासूची केली हत्या

आधी भाल्याने डोक्यावर केला हल्ला मग शॉक दिला, सूनेने सासूची केली हत्या

googlenewsNext

Crime News : पंजाबच्या अमृतसरमध्ये एका वृद्ध महिलेची हत्या झाली होती. पोलिसांनी या घटनेचा खुलासा करत मृत महिलेच्या सूनेला अटक केली. पोलिसांनी सांगितलं की, सासू-सूनेचं पटत नव्हतं. दोघींमध्ये नेहमीच भांडण होत होतं.

सासू संपवण्यासाठी सूनेने आधी तिच्या डोक्यावर भाल्याने हल्ला केला. नंतर तिला शॉक देऊन तिची हत्या केली. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला भाला ताब्यात घेतला आहे. आरोपी सूनेला रिमांडवर पाठवण्यात आलं आहे.

25 फेब्रुवारीला अजनाला गावातील सेंसरा कलांमध्ये अमरजीत कौर नावाच्या वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली होती. महिलेच्या डोक्याला जखम होती. घटनेनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. यादरम्यान पोलिसांनी कुटुंबिय आणि शेजाऱ्यांचे जबाब घेतले.

पोलिसांनी अमरजीत कौरची सून नरिंदरजीत कौरची चौकशी केली. सुरूवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. ज्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला. जेव्हा सख्तीने चौकशी केली तेव्हा तिनेच सगळं खरं सांगितलं.

आरोपी सून नरिंदरजीत कौरन पोलिसांना सांगितलं की, 15 वर्षाआधी तिचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यापासून तिचं सासू अमरजीत कौरसोबत अजिबात पटत नव्हतं. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच वाद होत होते. 25 तारखेलाही मोठा वाद झाला. यावेळी तिने भाल्याने सासूवर हल्ला केला. हत्येनंतर तिने सासूचा मृतदेह घरातच लपवला होता.

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी सूनेला अटक करण्यात आली आहे. हत्येसाठी वापरलेला भालाही जप्त केला आहे. आरोपी महिलेला दोन दिवसांच्या रिमांडवर पाठवलं आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
 

Web Title: Woman murder her mother in law by electrocution her in Amritsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.