धक्कादायक! ४० कोटी रूपयांच्या संपत्तीसाठी महिलेचा खून, आरोपी पती आणि मुलीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 11:43 AM2021-12-31T11:43:39+5:302021-12-31T11:44:27+5:30
Husband and Daughter Killed Women : पोलिसांनी सांगितलं की, पती आणि मुलीने मृत महिला अर्चनाची संपत्ती मिळवण्यासाठी तिच्या हत्येचा प्लान केला होता. पोलिसांनी सांगितलं की, प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेज व तक्रारीच्या आधारावर चौकशी केली गेली.
कर्नाटक (Karnataka) पोलिसांनी एका महिलेच्या हत्येच्या केसचा छडा लावत सात आरोपींना अटक केलीये. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींमध्ये मृत महिलेचा पती आणि तिची मुलगीही (Husband and Daughter Killed Women) आहे. २७ डिसेंबरच्या रात्री अर्चना रेड्डी नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली होती. या हत्येमागचं मुख्य कारण ४० कोटी रूपयांची संपत्ती होती. पोलीस म्हणाले की, आरोपींनी त्यांचा गुन्हा मान्य केलाय. मृत महिलेच्या मुलाने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी सांगितलं की, पती आणि मुलीने मृत महिला अर्चनाची संपत्ती मिळवण्यासाठी तिच्या हत्येचा प्लान केला होता. पोलिसांनी सांगितलं की, प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेज व तक्रारीच्या आधारावर चौकशी केली गेली. त्यानंतर सगळं सत्य समोर आलं. मृत महिलेचा पती नवीनने पाच लोकांसोबत आपल्या पत्नीवर हल्ला केला. तिच्यावर चाकूने वार करत तिची हत्या केली.
पोलिसांनी सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, मृत महिलेचा पती तिच्यावर चाकूने हल्ला करताना दिसत आहे. त्याच्यासोबत आणखी पाच लोक दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पती नवीनच्या अनैतिक संबंधांची माहिती पत्नीला होती. तेच पतीला या गोष्टीचा संशय होता की, त्याच्या पत्नीचे कुणासोबत तरी अनैतिक संबंध सुरू आहेत. यावरून घरात अनेकदा वाद होत होते.
डीसीपी श्रीनाथ एम जोशी यांच्यानुसार, मृत महिलेचा दुसरा पती नवीन कुमार आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मृत महिलेच्या मुलीला संशयित म्हणून अटक केली आहे. असा अंदाज आहे की, वडील आणि मुलीने महिलेची संपत्ती हडपण्यासाठी तिची हत्या केली.