नर्स असल्याचे भासवून महिलेचे दुष्कृत्य, एक दिवसाच्या अर्भकाचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 15:54 IST2022-07-24T15:53:03+5:302022-07-24T15:54:58+5:30
Crime News : शहरात खळबळ; घटना सीसीटीव्हीत कैद

नर्स असल्याचे भासवून महिलेचे दुष्कृत्य, एक दिवसाच्या अर्भकाचे अपहरण
तासगाव : बोगस नर्स म्हणून कामावर येऊन एका महिलेने येथील रुग्णालयातून एक दिवसाच्या अर्भकाचे अपहरण केले. हा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी पावणेनऊ वाजेच्या दरम्यान घडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेचा पोलीस शोध घेत आहेत.
येथील सिद्धेश्वर चौकातील सरस्वती आनंद रुग्णालयात एक महिला प्रसूत झाली. शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एक महिला नर्स असल्याचे भासवून संबंधितांच्या वाॅर्डमध्ये गेली. तेथून एक दिवसाच्या बालकाला घेऊन आपल्या काखेतील बॅगमध्ये टाकले. या बालकाला घेऊन महिलेने क्षणार्धात पलायन केले. या घटनेने हॉस्पिटलसह शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संबंधित महिलेचा पोलीस शोध घेत आहेत.
महिला सराईत
बालकाचे अपहरण केलेल्या महिलेने चार दिवसांपूर्वी तासगावात दोन रुग्णालयात नोकरीसाठी चौकशी केली होती. त्यानंतर सरस्वती आनंद हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपूर्वी नर्स म्हणून कामाला सुरुवात केली होती. या महिलेने रुग्णालयात दिलेला पत्ता चुकीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.