महिलेवर बलात्कार, रिक्षा चालकास अटक; महिलेकडून घेत होता सिगारेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 11:50 AM2022-09-20T11:50:08+5:302022-09-20T11:50:57+5:30

भाईंदर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील शिवकृपा मेडिकल जवळच्या रिक्षा स्टॅण्डवर शनिवारी मध्यरात्री एक महिला सिगारेटची विक्री करीत होती.

Woman raped, rickshaw driver arrested; The woman was selling cigarettes | महिलेवर बलात्कार, रिक्षा चालकास अटक; महिलेकडून घेत होता सिगारेट

महिलेवर बलात्कार, रिक्षा चालकास अटक; महिलेकडून घेत होता सिगारेट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मीरारोड : मध्यरात्रीनंतर एका ३० वर्षीय महिलेस मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या रिक्षा चालकास गुन्हे शाखेने १२ तासांत अटक केली. आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. 

भाईंदर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील शिवकृपा मेडिकल जवळच्या रिक्षा स्टॅण्डवर शनिवारी मध्यरात्री एक महिला सिगारेटची विक्री करीत होती. त्यावेळी अनोळखी रिक्षा चालकाने सर्व सिगारेट विकत घेण्याच्या बहाण्याने त्या महिलेस रिक्षात बसविले. तिला जबरदस्तीने केबिन-फाटक रोडच्या अंधाऱ्या गल्लीत नेले. तेथे तिला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता, गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकांत सागर व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास केला. 
आरोपी रिक्षा चालकाची कोणतीच माहिती नसल्याने, पोलिसांनी खबऱ्यांसह तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रिक्षाचा क्रमांक आणि मालक शोधून काढला. त्याची चौकशी केल्यावर त्या रात्री रिक्षा चालविणारा अनिल कुमार उर्फ कुंदन ओमप्रकाश मिश्रा (२८, रा. इंदिरानगर, नवघर, भाईंदर पूर्व) हा असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने रिक्षा चालक आरोपीला रविवारी अटक केली.

महिन्यात दुसरी घटना
गेल्याच महिन्यात शिकवणीसाठी जाणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अभद्र वर्तणूक करणाऱ्या रिक्षा चालक कृष्णकुमार बलदेव मौर्या यास अटक करण्यात आली होती. त्यावेळी मुलीने घाबरून चालत्या रिक्षातून उडी मारली होती.

Web Title: Woman raped, rickshaw driver arrested; The woman was selling cigarettes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.