३० वर्षीय महिलेने १४ वर्षीय मुलासोबत जबरदस्तीने ठेवले संबंध, बाळाला जन्म दिल्यावरच झाली पोलखोल....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 09:21 AM2021-02-22T09:21:34+5:302021-02-22T09:30:46+5:30
Woman Sexually Abused 14 Year Old Boy: अमेरिकेतील आयोवा प्रांतातील सीडर रॅपिड्समध्ये ३० वर्षीय महिला काउन्सेलरने १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केलं.
Woman Sexually Abused 14 Year Old Boy: अमेरिकेतून(America) एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका महिला काउन्सेलरने तिच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या लहान मुलाचं एक वर्षांपेक्षा जास्त काळ लैंगिक शोषण(Sexually Abused) केलं. आणि यानंतर ती गर्भवती झाली. या धक्कादायक प्रकरणाची आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे. चला जाणून घेऊ काय आहे नेमकं प्रकरण....
अमेरिकेतील आयोवा प्रांतातील सीडर रॅपिड्समध्ये ३० वर्षीय महिला काउन्सेलरने १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केलं. अल्पवयीन मुलासोबत बेकायदेशीरपणे शारीरिक संबंध ठेवल्यानंतर ही महिला गर्भवती झाली. त्यानंतर तिने अल्पवयीन मुलाच्या बाळाला जन्मही दिला. (हे पण वाचा : 'माझ्यासोबत काहीही करा, जिवे मारू नका'; असहाय्य बलात्कार पीडितेची नराधमांना विनवणी)
१४ वर्षीय अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण कऱणाऱ्या महिलेचं नाव डेनिल हुक आहे. जेव्हा या महिलेने तिच्या बाळाला जन्म दिला तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. तोपर्यंत याबाबत कुणाला काहीच माहीत नव्हते. कोर्टात पीडितच्या वकिलांनी सांगितले की, लैंगिक शोषणानंतर डेनिल हुकने अल्पवयीन मुलाच्या बाळाला जन्म दिला. याचा खुलासा डीएनए टेस्टनंतर झाला. टेस्टमध्ये अल्पवयीन मुलाचा आणि नवजात बाळाचा डीएनए मॅच झाला.
मार्च २०२० मध्ये पोलिसांनी महिलेा अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणाप्रकरणी अटक केली होती. ज्यानंतर महिलेला कोर्टात हजर केलं होतं. गेल्या बुधवारी महिलेला कोर्टात दोषी ठरवण्यात आलं. याआधी महिलेने कोर्टात अल्पवयीन मुलासोबत लैंगिक शोषण केल्याप्रकरणी लिखित माफी मागितली होती. (हे पण वाचा : भाच्यासोबतचे अनैतिक संबंध पतीला समजले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून व्हॅलेंटाईन डे ला पतीची केली हत्या....)
आयोवा डिपार्टमेंट ऑफ ह्यूमन सर्व्हिसनुसार, डेनिल हुकने १ जुलै २०१७ पासून ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केलं. महिलेने अल्पवयीन सोबत अनेकदा बेकायदेशीरपणे शारीरिक संबंध ठेवला.