हुंड्यासाठी महिलेचे मुंडण करून काढली धिंड, बेशुद्ध पडल्यावर दिले फेकून

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 06:16 PM2022-04-20T18:16:46+5:302022-04-20T18:17:29+5:30

Woman shaved off her head for dowry : कोतवाली हाथरस गेट परिसरातील एका गावात राहणाऱ्या या महिलेचे सात वर्षांपूर्वी अलीगढमधील अकराबाद भागातील एका तरुणासोबत लग्न झाले होते.

Woman shaved off her head for dowry, thrown to the canel bank | हुंड्यासाठी महिलेचे मुंडण करून काढली धिंड, बेशुद्ध पडल्यावर दिले फेकून

हुंड्यासाठी महिलेचे मुंडण करून काढली धिंड, बेशुद्ध पडल्यावर दिले फेकून

googlenewsNext

अलीगढ - हुंड्याच्या भुकेल्या लांडग्यांनी पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासला आहे. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्यांनी महिलेचे मुंडण करून तिला बेशुद्धावस्थेत कालव्याच्या काठावर फेकून दिले. अलिगढ जिल्ह्यातील  अकराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडलेल्या या घटनेचा गुन्हा हाथरसच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार महिला पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.

कोतवाली हाथरस गेट परिसरातील एका गावात राहणाऱ्या या महिलेचे सात वर्षांपूर्वी अलीगढमधील अकराबाद भागातील एका तरुणासोबत लग्न झाले होते. तिच्या सासरच्यांनी हुंड्याची मागणी करत छळ सुरू केल्याचा आरोप आहे. सासरचे लोक तिला अनेकदा मारहाण करायचे.

महिलेच्या म्हणण्यानुसार, हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने 14 एप्रिल रोजी सासरच्या लोकांनी तिचे मुंडण केले आणि तिला परिसरात फिरवले. एवढेच नाही तर या लोकांनी त्याला बेशुद्धावस्थेत अलिगढ रोडवरील कालव्याजवळ असलेल्या त्याच्या गावाजवळ सोडले.

हा प्रकार पीडितेच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी तिला त्यांच्या घरी आणले. त्यानंतर हे लोक पोलिस ठाण्यात गेले, मात्र पोलिसांनी त्यांचे ऐकले नाही. या लोकांनी पुन्हा पोलिस अधीक्षकांकडे दाद मागितली, त्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार या प्रकरणी विवाहितेचा पती अलीमुद्दीन आणि इतर काही सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महिला स्टेशन प्रभारी विपिन चौधरी सांगतात की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Woman shaved off her head for dowry, thrown to the canel bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.