महिलेने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली, त्याआधी पंतप्रधानांच्या नावे पत्र लिहून गेली!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 12:17 PM2021-07-03T12:17:12+5:302021-07-03T12:18:14+5:30
ही घटना आग्र्याच्या विद्यापुरम कॉलनीतील आहे. जिथे शुक्रवारी सकाळी साधारण १० वाजता महिलेने आपल्या राहत्या घरी देशी पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडली.
उत्तर प्रदेशच्या आग्रामधून एक दु:खद घटना समोर आली आहे. इथे एका महिले स्वत:च छातीवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला दोन मुलं आहेत. हे धक्कादायक पाउल उचलण्याआधी महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने तीन पानांची एक पत्र लिहिलं आहे. ज्यात तिने 'घरामधील महिलांची सुरक्षा' सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे. हे पत्र तिने तिच्या घरातील सदस्यांचा फोनवर पाठवलं होतं.
ही घटना आग्र्याच्या विद्यापुरम कॉलनीतील आहे. जिथे शुक्रवारी सकाळी साधारण १० वाजता महिलेने आपल्या राहत्या घरी देशी पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडली. महिलेचं नाव मोना द्विवेदी असून तिचं वय ३० आहे. रिपोर्ट्सनुसार, महिलेने स्वत:ला रूममध्ये बंद करून घेतलं होतं आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून घेतली. गोळी झाडल्याचा आवाज ऐकून परिवारातील इतर महिला दरवाजा तोडून आत शिरल्या. तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून त्या हैराण झाल्या. त्यांना महिला रक्ताच्या थोराळ्यात पडलेली दिसली.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे लिहिलेलं पत्र नंतर सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. त्यात तिने घरात राहणाऱ्या महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची विनंती करत पतीचे भाऊ पंकज आणि अनुजवर मारहाण करण्याचे आणि हे गंभीर पाउल उचलण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप केला आहे.
महिलेने पत्रात लिहिले की, 'अनुज आणि पंकज जे सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत. त्यांनी मला मारहाण केली. कारण मी एक गरीब परिवारातून आहे. माझ्या आईचं निधन मी लहान असतानाच झालं होतं आणि माझे वडील दारोडे आहेत. त्यांनी मला आपली दुर्दशा कुणाला सांगितली तर जीवे मारण्याची धकमी दिली'. तिने लिहिले की, 'जेव्हा ती १६ वर्षांची होती तेव्हा तिचं लग्न झालं होतं. सासरचे लोक तिला सतत त्रास देत होते. पण ती त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करू शकली नाही. कारण तिला तिचा पती सोडेल याची भीती होती.
याप्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितलं की, सुरूवातीच्या चौकशीतून असं समोर आलं आहे की, महिलेने आत्महत्या केली. पोलिसांनुसार, काही कौटुंबिक वाद होता आणि तिचे दीर तिला अनेक गोष्टींवरून सतत टोमणे मारत होते. याला कंटाळून तिने आत्महत्या केली.