Girlfriend ने बॉयफ्रेन्डवर चाकू अन् हातोड्याने केला जीवघेणा हल्ला, कारण वाचून चक्रावून जाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 10:10 AM2021-02-22T10:10:39+5:302021-02-22T10:14:42+5:30
Girlfriend Stabbed Boyfriend: गर्लफ्रेन्डने ६ इंचाच्या चाकूने आपल्या बॉयफ्रेन्डवर हल्ला केला. तरूणीने बॉयफ्रेन्डच्या चेहऱ्यावर एकापाठी एक सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की, पीडित तरूणाला काही करताही आलं नाही.
यूनायटेड किंगडम(UK) च्या इमिंघम शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथे एक तरूण आर्थिक अडचणीमुळे गर्लफ्रेन्डला २० यूरो म्हणजे १,७५८ रूपये देऊ शकला नाही. तर गर्लफ्रन्डने त्याच्यावर चाकू आणि हतोथ्याने (Girlfriend Stabbed Boyfriend) हल्ला केला. या घटनेत बॉयफ्रेन्ड गंभीर जखमी झालाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रबेक स्मिथने आपला बॉयफ्रेन्ड गोल्डसॅककडे २० यूरो म्हणजे १,७५८ रूपये मागितले होते. जेव्हा त्याने तिला पैसे दिले नाही तर ती भडकली आणि त्याच्यावर तिने जीवघेणा हल्ला केला. स्मिथने ६ इंचाच्या चाकूने आपल्या बॉयफ्रेन्डवर हल्ला केला. स्मिथने आपल्या बॉयफ्रेन्डच्या चेहऱ्यावर एकापाठी एक सपासप वार केले. (हे पण वाचा : धक्कादायक! मुलीने एक दिवसआधी केली होती मृत्यूची भविष्यवाणी, सांगितलं होतं तिथेच मिळाला मृतदेह....)
चाकूने हल्ला केल्यानंतर स्मिथने आपल्या बॉयफ्रेन्डच्या डोळ्यात जबरदस्ती बोट घातलं. ज्यानंतर तो जोरात ओरडू लागला होता. पण स्मिथने जराही दया दाखवली नाही. कसंतरी तरूणाने स्वत:ला सोडवलं आणि तेथून पळण्याचा प्रयत्न केला. इतक्यात स्मिथ एक हातोडा घेऊन आली आणि बॉयफ्रेन्डच्या हातावर हातोड्याने वार केला. ही घटना २४ जुलै २०२० ला घडली. (हे पण वाचा : प्रेयसीचं लग्न झाल्यावर प्रियकराने केला असा कारनामा, दहा दिवसात पतीने काढलं घराबाहेर...)
असा वाचला तरूणाचा जीव
दरम्यान बॉयफ्रेन्डचा जीव एका नर्सच्या कॉलने वाचला. पीडितने नर्सला सांगितले की, पोलिसांना बोलव आणि मला स्मिथपासून वाचव. तिच्याकडे चाकू आणि हातोडी आहे. ती माझा जीव घेईल. माझ्या शरीरातून खूप रक्त गेलं आहे. यानंतर पोलिसांना बोलवून त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
या प्रकरणावर आता कोर्टाने सांगितले की, सतत यूरो मागत असल्याने दोघांमध्ये भांडण झालं होतं. कोर्टाने स्मिथला आपल्या बॉयफ्रेन्डवर हल्ला करण्याच्या आरोपात १० वर्षांची तुरूंवासाची शिक्षा सुनावली आहे.
बॉयफ्रेन्ड काय म्हणाला?
मिररने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित बॉयफ्रेन्डने सुनावणी दरम्यान कोर्टात सांगितले की, आता मी कोणत्याही महिलेवर विश्वास ठेवणार नाही. मी कधीही विचार केला नव्हता की, ती माझ्यासोबत असं करेल. मला वाटत होतं की, मी तिला चांगल्या प्रकारे ओळखत होतो. पण जे झालं त्याचा विचार करून माझा थरकाप उडतो.