महिलेला विवस्त्र करून पार्कात काठ्यांनी केली मारहाण, लैंगिक अत्याचारानंतर केला खून
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 04:29 PM2022-02-03T16:29:03+5:302022-02-03T16:29:44+5:30
Sexual Abuse And Murder : तिचा मृतदेह एका उद्यानामध्ये विवस्त्र आणि विकृत अवस्थेत सापडला होता. या अमानुष हल्ल्यानंतर महिलेचा चेहरा ओळखणेही कठीण झाले होते.
कोलंबियामध्ये एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. हत्येपूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचारही झाला होता. तिचा मृतदेह एका उद्यानामध्ये विवस्त्र आणि विकृत अवस्थेत सापडला होता. या अमानुष हल्ल्यानंतर महिलेचा चेहरा ओळखणेही कठीण झाले होते.
'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, केली जोहाना तामायो बोर्केझ असे या २६ वर्षीय महिलेचे नाव आहे. चार मुलांची आई असलेली केली, तिच्या पूर्वीच्या जोडीदाराच्या "दहशतीखाली" राहत होती.
तिला बेदम मारहाण करण्यात आली!
केली जोहानाचा कुजलेला मृतदेह 30 जानेवारी रोजी सकाळी बुगा, वॅले येथील बायोसॅलुडेबल पार्कमध्ये सापडला. स्थानिक वृत्तानुसार, असे दिसून आले की, केलीचे प्रथम कपडे काढून टाकण्यात आले आणि नंतर लाठ्या आणि दगडांनी मारहाण करण्यात आली. तिच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा होत्या.
Cali24 नुसार, रानटी हल्ल्यानंतर केली जोहानाचा चेहरा देखील ओळखता येत नव्हता. तपासात गुंतलेल्या पोलिसांना लैंगिक अत्याचाराचे पुरावेही मिळाले आहेत. मृताची मावशी अलेक्झांड्रा बोहोर्केझ म्हणाली की, "तिच्या डोक्यावर दगड आणि काठ्यांनी मारहाण केली होती. तिला ओढून नेण्यात आले, तिची हल्लेखोराशी बाचाबाची देखील झाली." अलेक्झांड्रा पुढे म्हणाल्या की,"आम्ही न्यायाची मागणी करतो आणि हे प्रकरण लवकरात लवकर सोडवण्याचे आवाहन करतो. दोषींना शिक्षा झाल्याशिवाय सोडू नये."
Young mum stripped naked in park and beaten to death 'with sticks and stones' https://t.co/Z720sePykRpic.twitter.com/LPfgCVSTG5
— Daily Star (@dailystar) February 2, 2022
या प्रकरणी स्थानिक पोलीस कमांडर कर्नल नेल्सन दाबे पॅराडो म्हणाले की, आमच्याकडे एक विशेष तपास पथक आहे, जे अशा दुर्दैवी घटनांची उकल करण्यास सक्षम आहे. सध्या आम्ही आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहोत. पोलिसांना मदत करणाऱ्या व्यक्तीला बक्षीस दिले जाईल.
त्याचवेळी, महिलांवरील हिंसाचार ही देशातील गंभीर समस्या असल्याचे एका स्थानिक कार्यकर्त्यांच्या समुहाचे म्हणणे आहे. महिलांची हत्या झाली आहे, त्यापैकी फक्त 7% पीडितांना न्याय मिळाला आहे.