नवीन पनवेलमध्ये महिलेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 22:10 IST2019-07-11T22:09:21+5:302019-07-11T22:10:02+5:30
शारदा देवी असं मृत महिलेचं नाव

नवीन पनवेलमध्ये महिलेची आत्महत्या
पनवेल - नवीन पनवेलमधील बिमा सोसायटीमध्ये राहणाऱ्या चाळीस वर्षीय महिलेने बुधवारी रात्री 11 च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
शारदा देवी असे मृत महिलेचे नाव आहे.मानसिक प्रकृती व्यवस्थित नसल्याने या महिलेने हा प्रकार केला. ही मराहिला मूळ नेपाळची रहिवासी आहे. या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश मोरे यांनी दिली. वैफल्यग्रस्त असल्याने या महिलेने हे पाऊल उचलले. सध्याच्या ठिकाणी राहत असलेल्या राणा प्रसाद या इसमासोबत तिचे दुसरे लग्न झाले होते.