ह्द्रयद्रावक! पत्नीच्या चारित्र्यावर पतीला संशय; ३० किलो लोखंडी साखळीच्या बेडीत ३ महिने डांबून ठेवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 03:00 PM2021-07-01T15:00:10+5:302021-07-01T15:01:52+5:30

भैरूलाल वारंवार पत्नीला मानसिक त्रास देत होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस जेव्हा महिलेच्या घरी पोहचली तेव्हा एका रुममध्ये तिला लोखंडी साखळीने बांधलेले पाहिलं.

Woman tied to 30 kg iron chain for 3 months in allegation of infidelity pratapgarh in Rajasthan | ह्द्रयद्रावक! पत्नीच्या चारित्र्यावर पतीला संशय; ३० किलो लोखंडी साखळीच्या बेडीत ३ महिने डांबून ठेवलं

ह्द्रयद्रावक! पत्नीच्या चारित्र्यावर पतीला संशय; ३० किलो लोखंडी साखळीच्या बेडीत ३ महिने डांबून ठेवलं

googlenewsNext
ठळक मुद्देया महिलेला तिचं नाव विचारलं असता तिने तिचं नाव जीवाबाई असल्याचं सांगितले. आईची सेवा करण्यासाठी आणि शेती करण्यासाठी मी माझ्या माहेरी जात होती. माझं लग्नाव्यतिरिक्त बाहेरील कोणत्या पुरुषासोबत संबंध आहेत असं त्याला वाटतं

राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात एक ह्दयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी एका गावात युवकाला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होतो. त्याने त्याच्या पत्नीला मागील ३ महिन्यापासून ३० किलो वजनाच्या लोखंडी साखळीला बांधून ठेवलं आहे. ही घटना उघडकीस येताच अनेकांच्या मनात संतापाची भावना निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ या महिलेची सुटका केली.

पोलीस अधिकारी रविंद्र सिंह हे बीट कॉन्स्टेबल नेमीचंद आणि शिवसिंह यांच्या पथकासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी महिलेला लोखंडी साखळीने बांधल्याचं पाहिलं. पोलिसांनी या महिलेची सुटका करून तिची आणि तिच्या मुलाची भेट घडवून आणली. याबाबत पोलीस अधिकारी म्हणाले की, भैरूलाल पितानंदा मीणा त्यांच्या पत्नीवर संशय घेत होते. संशयामुळेच त्यांनी जवळपास ३ महिने लोखंडाच्या साखळीने तिला केलुपोश येथील घरात एका रुममध्ये बंधक बनवलं होतं.

भैरूलाल वारंवार पत्नीला मानसिक त्रास देत होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस जेव्हा महिलेच्या घरी पोहचली तेव्हा एका रुममध्ये तिला लोखंडी साखळीने बांधलेले पाहिलं. या महिलेला तिचं नाव विचारलं असता तिने तिचं नाव जीवाबाई असल्याचं सांगितले. या महिलेची चौकशी केली असता तिने पोलिसांना सांगितले की, माझं माहेर हिंगलाट येथे आहे. भैरुलाल मीणा यांच्यासोबत माझं लग्न झालं आहे. माझी आई सीताबाई ही हिंगलाट येथे वास्तव्यास आहे.

आईची सेवा करण्यासाठी आणि शेती करण्यासाठी मी माझ्या माहेरी जात होती. मात्र माझा नवरा तिथे येऊन मला मारहाण करत होता. मला माझ्या वयोवृद्ध आईची सेवा करायची होती. माझा नवरा दररोज दारू पिऊन येत माझ्यावर संशय घेत राहतो. माझं लग्नाव्यतिरिक्त बाहेरील कोणत्या पुरुषासोबत संबंध आहेत असं त्याला वाटतं. त्यासाठी तो माझा छळ करतो. होळीच्या उत्सवानंतर दोन-तीन दिवसांनी माझा नवरा भैरूलाल आणि मुलगा राजू आणि घरातील अन्य सदस्यांनी मला ३० किलो वजनाच्या लोखंडी साखळीनं बांधलं. तेव्हापासून मी एका बांधलेल्या झोपडीत राहत आहे असं तिने सांगितले.

महिलेला तिची व्यथा मांडताना रडू कोसळलं. जवळपास ३ महिने तिला बंधक बनवल्याने शारिरीक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. माझं आयुष्य बर्बाद झालं. माझा नवरा रोज मारहाण करतो. रात्रभर मला झोपूनही देत नाही. लोखंडी साखळी पायाला बांधाला त्याला कुलूप लावून तो निघून जात होता. पीडित महिलेने या छळात सहभागी असणाऱ्या सगळ्यांना कठोर शासन व्हावं अशी मागणी केली आहे.

 

Web Title: Woman tied to 30 kg iron chain for 3 months in allegation of infidelity pratapgarh in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस