कौटुंबिक वादातून महिलेने घेतले स्वत:स पेटवून
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 07:38 PM2020-02-10T19:38:10+5:302020-02-10T19:39:22+5:30
कौटुंबिक वादातून महिलेने संतापाच्या भरात पंचवटी पोलिस ठाण्याच्या बाहेर रस्त्यावर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले
नाशिक : पंचवटी परिसरात राहणाऱ्या एका महिलेने संतापाच्या भरात पंचवटी पोलिस ठाण्याच्या बाहेर रस्त्यावर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची घटना सोमवारी (दि.10) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत महिला 25 टक्के भाजली आहे.
परिसरातील कृष्णनगर (टकलेनगर) येथे राहणाऱ्या हरजिंदर अमरीतसिंग संधू (45) या महिलेची मुलगी अमनप्रित संधू (27) हिचा विवाह छत्तीसगड रायपूर येथिल युवकाशी झाला असून सदर मुलगी दोन दिवसांपूर्वी छत्तीसगड येथून परत आली. तिला आई वडील आणि पतीसमवेत राहायचे नाही असे तिने सांगितले त्यावरून दुपारपासून कुटुंबात वाद सुरू होता. ती मुलगी पोलिस ठाण्यात आली त्यावेळी तिच्या घरचे पोलिस ठाण्यात आले होते. त्या मुलीने पोलिस ठाण्यात मी आई वडील यांच्याकडे न राहता मैत्रीणी कडे राहणार असे लिहून दिले. त्याच वेळी तिची आई पोलिस ठाण्याकडे आली आपली मुलगी ऐकत नाही म्हणून संतापाच्या भरात त्या मुलीच्या आईने पंचवटी पोलिस ठाण्यासमोर रस्त्यावर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले.