बापरे! नराधमांनी महिलेची हत्या करून कापले गुप्तांग अन् डोळे घेतले काढून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 06:01 PM2021-08-06T18:01:28+5:302021-08-06T18:02:25+5:30
Internation Crime News : पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
अबुजा: नायजेरियात हत्येने खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महिलेची हत्या केल्यानंतर त्या नराधमाने तिच्या गुप्तांग (प्रायव्हेट पार्ट) आणि तिचे डोळे काढले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
गुप्तांग धारदार शस्त्राने कापला
प्रीमियम टाइम्स नायजेरियात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, आरोपीचे नाव ओनोस सिमन आहे. त्याचे वय 25 वर्षे आहे. ओनोस हा बाईक रायडर आहे. ओनोसने प्रथम एका ५० वर्षीय महिलेवर बलात्कार केला आणि नंतर तिचे गुप्तांग धारदार शस्त्राने कापल्याचा आरोप आहे. यामुळे पीडितेचा मृत्यू झाला.
७ जणांची आरोपींच्या तावडीतून सुटका
नायजेरियाच्या डेल्टा राज्याचे पोलीस आयुक्त अरी अली यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा खुलासा केला. ते म्हणाले की, अपहरण केलेल्या इतर ७ जणांचीही आरोपींच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. घटनास्थळावरून अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी शस्त्रे जप्त केली
पुढे ते म्हणाले की, आरोपींकडून २ एके ४७ रायफल आणि ४२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींवर कडक कारवाई केली जात आहे. त्याच्याविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंतर पोलीस अधिकारी म्हणाले की, तपासादरम्यान आरोपींचे संबंध शरीराच्या अवयवांचा अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांशी आहेत, असे आढळले आहे. या प्रकरणात अधिक पुरावे गोळा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.