kiss करायला नकार दिल्याने महिलेने गोळ्या घालून ठार मारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 02:20 PM2021-10-19T14:20:46+5:302021-10-19T14:21:33+5:30
Woman Reportedly Killed Man After He Refused To Kiss Her : या धक्कादायक घटनेत अमेरिकेतील इलिनॉयमध्ये एका २८ वर्षीय महिलेने एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार मारले
अमेरिकेतील इलिनॉयमध्ये एका धक्कादायक घटनेत एका २८ वर्षीय महिलेने एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार मारले. या हत्येमागील कारण चक्रावून टाकणारं आहे. ज्यावेळी रात्री मद्यपान केल्यानंतर व्यक्तीने महिलेला किस करण्यास नकार दिला, त्यावेळी संतप्त महिलेने त्याला गोळ्या घालून संपवले.
शिकागो सन-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, क्लाउडिया रेसेंडिझ-फ्लोरेस एका जोडप्यासह (जे तिचे मित्र आणि मैत्रीण होते) एका अपार्टमेंटमध्ये हँग आउट करत होती आणि मद्यपान करत होती. या धक्कादायक घटनेत अमेरिकेतील इलिनॉयमध्ये एका २८ वर्षीय महिलेने एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार मारले, जेव्हा त्याने रात्री मद्यपान केल्यानंतर तिला किस करण्यास नकार दिला.
आरोपी महिला रेसेंडिझ-फ्लोरेज आणि ते जोडपं गुरुवारी मद्यपान करत असताना रेसेंडिझ-फ्लोरेजने २९ वर्षीय जेम्स जोन्सला चुंबनासाठी विचारले, त्यास त्याने नाकारले. त्यानंतर जेम्स त्याच्या प्रेयसीकडे वळला आणि तिला चुंबन देण्यास सुरुवात केली, त्यामुळे रेसेन्डिझ-फ्लोरेसला त्याचा मत्सर आला, असे वकील कुक काउंटींना सांगितले.
रेसेन्डिझ-फ्लोरेसनंतर अधिक आक्रमक झाली आणि पुन्हा एकदा जेम्सकडे चुंबन मागितले. जेव्हा जेम्सने पुन्हा नाही म्हटले, तेव्हा संतापलेल्या रेसेंडिझने तिची बंदूक पकडली आणि दोन पलंगाच्या कुशन्समध्ये ठेवली होती आणि त्याला लक्ष्य केले, असे वकिलांनी सांगितले.
जेम्सने रेसेन्डिझ-फ्लोरेसचा खांदा खाली ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने स्वतःला बचावत ट्रिगरवर बोट ठेवलं आणि बंदुकीतून गोळी निघून गेली आणि जोन्सच्या छातीवर जाऊन आदळली. त्याच्या प्रेयसीने ९११ वर फोन केला आणि त्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी रेसेन्डिझ-फ्लोरेसने जेम्सवर गोळीबार केल्याची कबुली दिली. तिच्यावर फर्स्ट-डिग्री हत्येचा आरोप होता. या प्रकरणी कोर्टात खटला सुरु असून रेसेन्डिझ-फ्लोरेस गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर होण्याची शक्यता आहे.